scorecardresearch

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतून युजवेंद्र चहलचा पत्ता कट, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

IND vs AUS, T20 series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० संघात स्थान न मिळाल्याने युजवेंद्र चहलने गूढ पोस्ट शेअर केली आहे. विश्वचषकात देखील त्याला संधी मिळाली नव्हती.

Team India: Chahal did not get a place in the team for the IND-AUS T20 series created a stir with this post
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० संघात स्थान न मिळाल्याने युजवेंद्र चहलने गूढ पोस्ट शेअर केली आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia, T20 series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताने सोमवारी (२० नोव्हेंबर) आपला संघ जाहीर केला. विश्वचषक फायनलनंतर अवघ्या ४ दिवसांनी ही टी२० मालिका सुरू होत आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सूर्यकुमार यादवची टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. भारताने या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा वगळता विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

टी२० मालिकेत चहलची निवड न झाल्याने त्याने सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर

ज्या दोन खेळाडूंची टी२० मालिकेसाठी निवड न झाल्याची चर्चा आहे, त्यात संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. लेगस्पिनर युजवेंद्र चहलने या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून शेवटचा टी२० सामना खेळला होता. भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत निवड न झाल्याने युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. भारतीय संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर एक स्मायली इमोजी शेअर केला आहे.

IND vs AUS: India's winning start in the World Cup defeating Australia by six wickets Rahul ended the match with a six
IND vs AUS, World Cup: विश्वचषकात भारताची विजयी सलामी! विराट-राहुलच्या दमदार खेळीपुढे ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे, सहा विकेट्सने शानदार विजय
IND vs AUS: Ashwin makes a brilliant comeback in the World Cup after eight years gets a chance against Australia
IND vs AUS, World Cup: अश्विनचे आठ वर्षांनंतर विश्वचषकात शानदार पुनरागमन, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिळाली संधी
World Cup 2023 Updates
World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘या’ दिग्गज खेळाडूचे खेळणे कठीण
IND vs AUS: Team India arrives in Rajkot for 3rd ODI Rohit Brigade ready to whitewash Australia watch Video
IND vs AUS: तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया पोहोचली राजकोटला; ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज, पाहा Video

यापूर्वीही युजवेंद्र चहलची विश्वचषक संघातही निवड झाली नव्हती. या लेगस्पिनरने जानेवारी २०२३ मध्ये शेवटचा वन डे खेळला होता. यानंतर, तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा भाग होता, परंतु एकही सामना खेळू शकला नाही कारण, संघ व्यवस्थापनाने रिस्ट स्पिनर गोलंदाज कुलदीप यादव तसेच फिंगर स्पिनर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना पहिले प्राधान्य दिले.

दुखापतीमुळे विश्वचषक खेळू न शकलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियात परतला आहे. लेगब्रेक गोलंदाज रवी बिश्नोई आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषकातून युजवेंद्र चहलचा पत्ता कट झाला आहे का, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. बीसीसीआय याबाबत नक्की काय विचार करत, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “१६ तास झाले, पण अजूनही दु:ख…”, भारताच्या वर्ल्डकप पराभवावर शुबमन गिलची इन्स्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत

चहलने टीम इंडियातील आपल्या अनुपस्थितीचा फायदा घेतला आणि सप्टेंबरमध्ये कौंटी चॅम्पियनशिपमध्ये केंटसाठी कसोटी सामने खेळला. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी२० मध्येही तो हरियाणाकडून खेळला आणि त्याने ७ सामन्यात ११ विकेट्स घेतल्या. तसेच, त्याच मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने उत्तर प्रदेशकडून खेळताना ७ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या, त्याची देखील टी२० मालिकेसाठी निवड झाली नाही. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा टी२० संघ जाहीर, सूर्यकुमार यादव असेल कर्णधार)

हेही वाचा: IND vs AUS: “तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंना संधी देणे…” अनिल कुंबळेने सूर्यकुमारच्या आधी जडेजाला पाठवण्याबाबत केले सूचक विधान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा टी२० संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी२०: २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम

दुसरा टी२०: २६ नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम

तिसरा टी२०: २८ नोव्हेंबर, गुवाहाटी

चौथा टी२०: १ डिसेंबर, रायपूर

पाचवा टी२०: ३ डिसेंबर, बंगळुरू

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus chahal did not get a chance in t20 team leg spinner shared cryptic post avw

First published on: 21-11-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×