scorecardresearch

Premium

IND vs AUS: फक्त १९ धावा…; बंगळुरूमध्ये ऋतुराज गायकवाड मोडणार कोहलीचा विक्रम? जाणून घ्या

IND vs AUS, 5th T20: आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात विराटचा मोठा विक्रम मोडण्यासाठी ऋतुराज गायकवाडला १९ धावांची गरज आहे.

19 more runs Then Rituraj Gaikwad will break Kohli's all-time Indian record will do magic in Bengaluru
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात विराटचा मोठा विक्रम मोडण्यासाठी ऋतुराज गायकवाडला १९ धावांची गरज आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 5th T20 Match: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ऋतुराज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या टी-२० सामन्यात १९ धावा करताच ऋतुराज गायकवाड विराट कोहलीचा भारतीय विक्रम मागे टाकू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या ४ डावात शतक आणि अर्धशतकाच्या मदतीने सर्वाधिक २१३ धावा केल्या आहेत. कोणत्याही टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय खेळाडू विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीच्या नावावर २३१ धावा आहेत तर के.एल. राहुल २२४ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राहुलने २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. राहुलला मागे टाकण्यासाठी गायकवाडला १२ धावांची गरज आहे.

Baroda fail to take lead against Mumbai in quarter final of Ranji Trophy sport news
मुंबईची पहिल्या डावात आघाडी,बडोदाच्या पहिल्या डावात ३४८ धावा; मुंबई तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २१
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Yashasvi Jaiswal's second consecutive double century against England
IND vs ENG : द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची विराट-कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी, गावसकरांच्या क्लबमध्येही मिळवले स्थान
India need 9 wickets to win in IND vs ENG 2nd Test Match
IND vs ENG : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची, तर भारताला ९ विकेट्सची गरज

हेही वाचा: IND vs AUS: इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! वॉशिंग्टन-तिलक यांना मिळू शकते संधी, जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटचा टी-२० एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा टी-२० आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यापूर्वी येथे सात आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारताने येथे पाच टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन पराभव पत्करावा लागला आहे. येथे फलंदाजांसाठी आव्हान असणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS: पाचव्या टी-२० सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एम. चिन्नास्वामी स्टेडियमची काय आहे आकडेवारी, जाणून घ्या

भारतीय टी-२० संघ

रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, दीपक चाहर, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई.

ऑस्ट्रेलिया टी-२० संघ

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, बेन ड्वाराहुसी, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅविस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus rituraj gaikwad can break virat kohlis big record needs only 19 runs avw

First published on: 03-12-2023 at 16:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×