India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषकातील सर्वात मोठा सामना आज (१९ नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियन संघांना १.२५ लाखांहून अधिक प्रेक्षकांमध्ये हा सामना खेळण्याची संधी मिळाली. तो संस्मरणीय करण्यावर दोघांची नजर असेल. भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन होण्याकडे डोळे लावून बसला आहे. त्याने १९८३ आणि २०११ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्याआधी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्याने विराट कोहलीला त्याची २०११ विश्वचषकातील जर्सी देखील भेट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदाबादला पोहचताच त्याने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, “मी पाकिस्तान सामन्यावेळी इथे आलो होतो. त्यावेळी देखील मी म्हटले होते की, जो सगळ्यांना अपेक्षित निर्णय आहे तोच येईल आणि तसेच झाले. भारतीय संघाने तो सामना जिंकला. आजही मी इथे सामना पाहण्यासाठी आलो आहे आणि त्यादिवशी जे सांगितलं तेच आज सांगेन की, जो आपल्या सगळ्यांना निर्णय अपेक्षित आहे तेच आज होईल. भारतीय संघ आजचा सामना जिंकेल आणि विश्वचषकाची ट्रॉफी उंचावेल.” त्याचवेळी आजच्या सामन्याआधी सचिनने विराट कोहलीला २०११च्या विश्वचषकातील त्याची जर्सी भेट म्हणून दिली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मला प्रथम फलंदाजी करायची होती. ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही. आतापर्यंतच्या सामन्यात भारताने आपल्या तीन विकेट्स गमावल्या आहेत. विराट कोहली आणि के.एल. राहुल खेळपट्टीवर टिकून आहेत. कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक हुकले, तो ४७ धावा करून बाद झाला. टीम इंडियाला सध्या मोठ्या भागीदारीची गरज आहे. त्यामुळे के.एल. राहुल आणि विराट कोहली यांच्यावर टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे.

हेही वाचा: IND vs AUS Final: “भारतात वेगवगळ्या ठिकाणी खेळपट्टी ही…”, अहमदाबादमधील अंतिम सामन्याआधी वसीम अक्रमचे मोठे विधान

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus sachin tendulkar gifted a jersey to kohli and wished team india good luck avw
First published on: 19-11-2023 at 15:28 IST