Indian cricket Team, IND vs ENG: भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा विश्वचषकापूर्वी संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागी अश्विनला संधी मिळाली आहे. बराच काळ एकदिवसीय संघापासून दूर असलेला अश्विन भाग्यवान ठरला आणि त्याला पुन्हा एकदा विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. २०११ मध्ये चॅम्पियन झालेल्या टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी अश्विनने मोठे वक्तव्य केले आहे.

अश्विनने शनिवारी (३० सप्टेंबर) कबूल केले की, २०२३चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक हा त्याचा संघासाठी शेवटचा विश्वचषक असणार आहे. भारतीय फिरकीपटूने अश्विननेही संघात निवड होण्याबाबत विचार केला नसल्याचे सांगितले. त्याच्यासाठी हा निर्णय अनपेक्षित असा होता. अश्विन गेल्या वर्षी टी२० विश्वचषकही खेळला होता. मात्र, त्यानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

खेळाचा आनंद घेणे हे माझे पहिले उद्दिष्ट: अश्विन

अश्विन म्हणाला, “मी प्रामाणिकपणे सांगतो की, माझी विश्वचषक संघात निवड होईल असे मला मुळीच वाटले नव्हते. विश्वचषकात खेळण्याचा विचार माझ्या मनातही नव्हता. खेळाचा आनंद लुटणे हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून माझे मुख्य उद्दिष्ट आहे आणि या स्पर्धेत मला तेच पुन्हा करायला आवडेल. मी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यांनी मला आता काही काळ कॅमेऱ्यासमोर आणू नये, पण ही कदाचित अशा परिस्थितींपैकी एक आहे जिथे ते म्हणाले की, दिनेश कार्तिक तुमची मुलाखत घेत आहे.”

हेही वाचा: Asian Games 2023: भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्ण पदक! पुरुष संघाने स्क्वॉशमध्ये पाकिस्तानचा अंतिम फेरीत केला पराभव

टी२० वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार नाही

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विश्वचषकापूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, हा त्याचा शेवटचा विश्वचषक असणार आहे. यामुळे अश्विनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पुढच्या वर्षी टी२० विश्वचषक होणार आहे, पण अश्विनने भारतासाठी बराच काळ विश्वचषक खेळलेला नाही. त्यामुळे त्याला टी२० विश्वचषकात संधी दिली जाणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. याबाबत अश्विन म्हणाला की, “हा विश्वचषक त्याचा शेवटचा विश्वचषक असणार आहे.”

आयुष्याने एक विचित्र वळण घेतले – अश्विन

अश्विन म्हणाला की, “माझे आयुष्य आश्चर्यांनी भरलेले आहे. खरं सांगायचं तर आयुष्य या वळणावर येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आज मी इथे आहे हे परिस्थितीने निश्चित केले आहे.” तो पुढे म्हणाला की, “संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या टूर्नामेंटमध्ये दबावाला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे आणि ही स्पर्धा कशी असेल ते ठरवेल. चांगल्या ठिकाणी असल्याने, या स्पर्धेचा आनंद घेतल्याने मी चांगल्या स्थितीत राहीन.” अश्विन म्हणाला की, “भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक असू शकतो, त्यामुळे या स्पर्धेचा आनंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकली

बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सराव सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे पंचांनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा: Waqar Younis: विश्वचषक २०२३च्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वकार युनूसचे सूचक विधान; म्हणाला, “टीम इंडियाच्या तुलनेत आम्ही…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत सिस्लाराम, मोहम्मद बुमराह, मोहम्मद शमी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड: डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, रीस टोपले, मार्क वूड.