Rohit Sharma press conference: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा सामन्यानंतर चांगलाच संतप्त दिसत होता. रोहितने तीन वर्षांतील हे पहिले एकदिवसीय शतक असल्याचे सांगणाऱ्या ब्रॉडकास्टरला फटकारले आणि सांगितले की तुम्हाला योग्य गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, “गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे तो फार कमी एकदिवसीय सामने खेळला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. तेव्हापासून ब्रॉडकास्टर्स सातत्याने दाखवत आहेत की जानेवारी २०२० पासून हे त्याचे पहिले शतक आहे. आकडेवारी बरोबर असू शकते, परंतु रोहित म्हणतो की ते योग्य चित्र दर्शवत नाही.”

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे

‘ब्रॉडकास्टरनेही योग्य गोष्ट दाखवावी’

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “तीन वर्षांतील हे पहिले शतक असले तरी या काळात मी केवळ १२ वन डे खेळलो. काय घडत आहे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. मला माहित आहे की ते प्रसारणादरम्यान दाखवले गेले होते, परंतु कधीकधी त्या गोष्टीची देखील काळजी घेतली पाहिजे. ब्रॉडकास्टरनेही योग्य गोष्ट दाखवली पाहिजे.”

‘हिटमॅन’चे हे पुनरागमन आहे का, असे विचारले असता तो म्हणाला, “मी म्हटल्याप्रमाणे २०२० मध्ये कोणतेही सामने झाले नाहीत. कोरोनामुळे सर्वजण घरात कोंडले होते. आम्ही एकदिवसीय सामने खेळलो नाही आणि मला दुखापतही झाली. त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आम्ही गेल्या वर्षी टी२० क्रिकेट खेळत होतो आणि यावेळी सूर्यकुमार यादवपेक्षा चांगला फलंदाज कोणी नाही. त्याने दोन शतके झळकावली आहेत आणि मला वाटत नाही की इतर कोणी असे केले असेल.”

रँकिंग वगैरे काही फरक पडत नाही

रोहित रोहितने सांगितले की, “शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद करण्याची योजना कशी आखली.” तो पुढे म्हणाला, “या फॉरमॅटमध्ये तुम्हाला तुमचे कौशल्य वापरावे लागेल आणि शार्दूलकडे ते आहे. त्याने एका शानदार चेंडूवर टॉम लॅथमला बाद केले. याचे नियोजन विराट, हार्दिक आणि शार्दूल यांनी केले होते.

हेही वाचा: Australian Open 2023: ग्रँडस्लॅम विजेतेपदासह कारकीर्द संपेल? सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत

शतक झळकावणाऱ्या शुबमन गिलचे कौतुक करताना कर्णधार म्हणाला, “या मालिकेत त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याला त्याचा खेळ समजला आणि त्याने डावाच्या सूत्रधाराची भूमिका बजावली.” या विजयासह भारत एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला पण रोहित म्हणाला, “खरं सांगायचं तर रँकिंग वगैरे काही फरक पडत नाही. या मालिकेपूर्वी आम्ही चौथ्या क्रमांकावर होतो. आम्ही चौथ्या स्थानावर कसे होतो माहीत नाही कारण आम्ही काही मालिका गमावल्या होत्या. आम्ही त्याचा फारसा विचार करत नाही. प्रत्येक मालिकेसोबत आत्मविश्वास वाढतो.”