लखनऊच्या एकना स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी२० सामना खेळला गेला. मात्र, हा सामना पाहुण्यांसाठी फारसा काही ठरला नाही, कारण दोन्ही संघ १०० धावांपर्यंत मजल मारताना दिसत होते. न्यूझीलंडचा संघ २० षटकांत केवळ ९९ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतानेही केवळ एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली. आता एकना स्टेडियमच्या पिच क्युरेटरला फटका बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तानुसार, विद्यमान पिच क्युरेटरच्या जागी संजीव कुमार अग्रवाल यांना एकना स्टेडियमचे नवीन पिच क्युरेटर बनवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “संजीव हा अतिशय अनुभवी पिच क्युरेटर आहे आणि आम्ही एका महिन्यात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू. टी२० पूर्वी, सर्व केंद्र विकेटवर बरेच देशांतर्गत क्रिकेट खेळले गेले होते. क्युरेटरने आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी एक किंवा दोन पट्ट्या सोडल्या पाहिजेत. पृष्ठभागाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता आणि खराब हवामानामुळे नवीन विकेट तयार करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.

पुढील सामन्यापूर्वी पुरेसा वेळ

संजीव अग्रवाल यांनी यापूर्वी बांगलादेशात खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षी त्याला तेथून हटवण्यात आले. आता त्याला गोष्टी व्यवस्थित करण्याचे काम देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बीसीसीआयचे अनुभवी क्युरेटर तपोश चॅटर्जी यांच्यासोबत काम करणार आहे. लखनऊमध्ये सध्या एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही. महिलांचे आयपीएल सामने आता येथे खेळवले जाऊ शकतात. अशा स्थितीत संजीवकडे खेळपट्टी दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ असेल.

हेही वाचा: ILT20: एकाने चेंडू घेऊन पळ काढला, तर एकाने परत केला… रोहितच्या जिगरी दोस्ताने केली गोलंदाजांची धुलाई, Video व्हायरल

कर्णधार हार्दिक म्हणाला, “टी२० ची किंमत नाही”

याआधी कर्णधार हार्दिकने खेळपट्टीबाबत कडक टिप्पणी केली होती. तो म्हणाला होता, “ही खेळपट्टी टी२० साठी योग्य नाही. मला खात्री होती की आम्ही सामना पूर्ण करू शकू, पण त्यासाठी बराच वेळ लागला. सामन्यातील परिस्थिती लक्षात घेता हे महत्त्वाचे आहे. घाबरण्याची गरज नव्हती. या खेळपट्टीवर स्ट्राईक रोटेट करणे अधिक महत्त्वाचे होते. आम्ही तेच केले.”

हार्दिक पुढे म्हणाला, “ही एक धक्कादायक खेळपट्टी होती. मात्र, आम्हाला खेळपट्टीची फारशी हरकत नाही. त्यासाठीही आम्ही पूर्णपणे तयार आहोत, पण ही खेळपट्टी टी२० क्रिकेटसाठी बनलेली नाही. क्युरेटर्स किंवा आम्ही ज्या ठिकाणी खेळणार आहोत त्यांनी हे पाहावे की ते खेळपट्ट्या वेळेत तयार करतात. याशिवाय मी इथल्या प्रत्येक गोष्टीत खूप आनंदी आहे. या मैदानावर १२० धावा करणारा संघ सामना जिंकू शकतो. दवने येथे फारशी भूमिका बजावली नाही. न्यूझीलंडचे फिरकीपटू आमच्यापेक्षा जास्त चेंडू फिरवू शकले. चेंडू चांगली फिरत होता. ती खरोखरच धक्कादायक खेळपट्टी होती.”

काय घडलं सामन्यामध्ये?

न्यूझीलंडने आठ गड्यांच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या. त्याच्यासाठी २० धावांचा आकडा एकाही फलंदाजाला स्पर्श करता आला नाही. कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद १९ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेल १४, मार्क चॅपमन १४, फिन ऍलन ११ आणि डेव्हॉन कॉनवे ११ धावांवर बाद झाले. भारताकडून अर्शदीप सिंगने दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: Bumrah vs Shaheen: बुमराहला आधी म्हटला ‘बेबी बॉलर’… आता शाहीन आफ्रिदीशी तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने तोडले अकलेचे तारे

या सामन्यात एकही षटकार मारला नाही

प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकात एक चेंडू राखून लक्ष्य गाठले. इशान किशन १९, राहुल त्रिपाठी १३, शुबमन गिल ११ आणि वॉशिंग्टन सुंदर १० धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत नाबाद २६ आणि हार्दिक पांड्याने २० चेंडूत नाबाद १५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या दोन्ही डावात एकही षटकार मारला नाही. एकूण २३९ चेंडू टाकले, पण एकही षटकार लागला नाही. फिरकीपटूंनी सामन्यातील दोन्ही डावांसह ३० षटके टाकली. न्यूझीलंडकडून ईश सोधी आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. बुधवारी अहमदाबादमध्ये टी२० मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz the pitch curator of lucknows ekana stadium fell on the pitch hardik expressed displeasure after the second t20 avw
First published on: 31-01-2023 at 13:17 IST