सलग तिसरा पराभव टाळण्याचे भारताचे लक्ष्य

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला आफ्रिकेने पहिल्या सामन्यात आठ, तर दुसऱ्या सामन्यात सहा गडी राखून धूळ चारली.

(संग्रहित छायाचित्र)

 

एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिकाही गमावणाऱ्या भारतीय महिला संघाकडून किमान तिसऱ्या लढतीत कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आहे.

मंगळवारी होणाऱ्या या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ सलग तिसरा पराभव टाळून शेवट गोड करण्यासाठी सज्ज झाला आहे.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला आफ्रिकेने पहिल्या सामन्यात आठ, तर दुसऱ्या सामन्यात सहा गडी राखून धूळ चारली.  सलामीवीर शफाली वर्मा, हरलीन देओल यांनी भारतासाठी आतापर्यंत उत्तम योगदान दिले आहे. परंतु स्मृती, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष यांना फलंदाजीत सुधारणेची आवश्यकता आहे. गोलंदाजीत पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा अपयशी ठरत आहे.

* वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स २

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India goal to avoid third defeat in a row abn

ताज्या बातम्या