इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज फैसला

‘आयपीएल’च्या नव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी—२० क्रिकेटच्या १५व्या हंगामासाठी संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे आठही संघ नेमके कुणाकुणाला संघात ठेवणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चार खेळाडू संघात कायम राखण्याची परवानगी आहे. त्यामध्ये तीन भारतीय आणि एक विदेशी अथवा दोन भारतीय आणि दोन विदेशी अशा रचनेसह संघमालक खेळाडूंना कायम राखू शकतात. चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड या तीन खेळाडूंना आधीच कायम राखल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली; परंतु अन्य संघांतील खेळाडू मंगळवारीच स्पष्ट होतील.

‘आयपीएल’च्या नव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य संघांना नकोशा झालेल्या खेळाडूंमधून या नव्या संघांना तीन खेळाडूंची निवड करण्याची १ ते २५ डिसेंबरदरम्यान संधी आहे.  मग जानेवारीमध्ये खेळाडूंची लिलावप्रक्रिया होईल.

’ वेळ : सायंकाळी ५ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

या खेळाडूंची जागा पक्की?

’ मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, किरॉन पोलार्ड, इशान किशन.

’ चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.

’ दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, आनरिख नॉर्किए.

’ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेल.

’ सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन, भुवनेश्वर कुमार, रशीद खान.

’ राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, जोस बटलर.

’ कोलकाता नाइट रायडर्स : वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन.

’ पंजाब किंग्ज : मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2022 retention players likely to be retained in indian premier league zws