scorecardresearch

Premium

IPL 2023 CSK vs GT: धोनीच्या संघात सामील झालेला आकाश सिंग कोण आहे? सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

IPL 2023 Chennai Super Kings vs Gujarat Titans:आयपीएल २०२३ मधील सलीमीचा सामना चेन्नई आणि गुजरात संघांत खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसके संघाने आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे.

IPL 2023 GT vs CSK Match
चेन्नई सुपर किंग्स वि गुजरात टायटन्स मॅच अपडेट्स (फोटो- संग्रहिच छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

CSK has replaced Mukesh Chaudhary with Akash Singh:आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या मुकेश चौधरीच्या जागी सीएसकेने डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश सिंगचा संघात समावेश केला आहे. आकाशला मुकेशची लाईक टू लाईक रिप्लेसमेंट म्हटले जात आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी आकाशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीने फलंदाजांची तारांबळ उडवताना दिसत आहे.

आकाश सिंग आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये नागालँडचे प्रतिनिधित्व करतो. २०२२-२३ पूर्वी तो राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पणही केले. विशेष म्हणजे आकाश सिंगने त्याचा एकमेव आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने एकही विकेट घेतली नाही, मात्र त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांचे लक्ष नक्कीच वेधून घेतले होते.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

आकाश सिंगची आयपीएल कामगिरी –

आकाश सिंगला आयपीएल २०२३ च्या लिलावात एकही खरेदीदार मिळाला नव्हता. परंतु आता मुकेश चौधरीच्या दुखापतीनंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. आकाशने आतापर्यंत खेळलेल्या ९ टी-२० सामन्यांमध्ये ७.८७ च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह ७ विकेट घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

मुकेश चौधरी संघातून बाहेर –

मुकेश चौधरी संघातून बाहेर पडल्याने सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या मोसमात या गोलंदाजाने चमकदार कामगिरी करताना १६ बळी घेतले होते. यातील पॉवरप्लेमध्ये त्याने ११ विकेट घेतल्या. मुकेश चौधरीशिवाय न्यूझीलंडचा काईल जॅमिसनही स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर श्रीलंकेचा महेश टीक्षाना आणि मातिषा पाथिराना उशिरा संघात सामील होतील. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनची निवड करण्यासाठी धोनीला खूप विचारमंथन करावे लागेल.

आयपीएल २०२३ साठी सीएसके संघ:

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, सिमरजित सिंह, दीपिका, दीपिका, प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा आणि आकाश सिंग.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Csk has replaced mukesh chaudhary with akash singh for ipl 2023 vbm

First published on: 31-03-2023 at 13:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×