scorecardresearch

Premium

CSK vs GT, IPL 2023 Final : पावसामुळे सामना रद्द झाल्यास ‘या’ दिवशी रंगणार आयपीएल २०२३ ची फायनल

IPL 2023 Final, GT vs CSK Live Match Updates : आयपीएल २०२३ च्या फायनलच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे.

IPL 2023 Final Match GT vs CSK Live Scorecard Updates
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल २०२३ फायनल लाइव्ह मॅच अपडेट्स

Rain Stopped Play Of IPL 2023 Final : आयपीएल २०२३ च्या फायनलच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ७.३० वाजता सुरु होणार होता. मात्र, मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामन्यात व्यत्यय आलं आहे. जर हा सामना ९.३५ वाजता सुरु झाला, तर हा सामना पूर्ण २० षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाना २० षटके मिळतील. पण १२.०६ वाजेपर्यंत पाच षटकांचा सामना झाला नाही, तर उद्या सोमवारी राखीव दिवशी २९ मे ला पुन्हा हा फायनलचा सामना खेळवण्यात येईल. सोमवारीही हा सामना झाला नाही, तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सला यंदाच्या आयपीएल हंगामाचं जेतेपद देण्यात येईल.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांची वेळ उपलब्ध असेल. आयपीएल २०२३ च्या फायनलसाठी कट ऑफ टाईम जर ७.३० वाजता सुरु झाला, तर ५ षटक प्रति साइड गेमसाठी ११.५६ वाजेपर्यंत असेल. जर हे ८ वाजता सुरु झालं, तर कट ऑफ टाईम १२.२६ पर्यंत असेल. परंतु, सामन्याच एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला विजेता घोषीत केला जाईल.

नक्की वाचा – …म्हणून अंबाती रायुडूने IPL मधून निवृत्त होण्याचा घेतला निर्णय, यामागचं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

आयपीएल २०२३ च्या लीग राऊंडमध्ये १० सामने जिंकून गुजरातचा संघ गुणतालिकेत २० अंकांनी अव्वल स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या १४ सामन्यांमध्ये ८ सामने जिंकून १७ गुण मिळवले आहेत. त्यामुळे सीएसके दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच फायनलचा सामना पावसामुळं रद्द झाला तर, गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If rain stopped play of ipl 2023 final between chennai super kings and gujrat titans 29 th june reserve day for match nss

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×