Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru IPL 2024 Highlights : मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून सहज पराभव केला आहे. आरसीबीने प्रथम खेळताना १९६ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला झंझावाती सुरुवात करून दिली. रोहित आणि किशन यांच्यात १०१ धावांची उत्कृष्ट आणि स्फोटक भागीदारी झाली. इशान किशनने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने ३४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या ६ षटकात ७२ धावा केल्या होत्या. दरम्यान, रोहितने २४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. सूर्यकुमार यादवही लयीत परतला आहे कारण त्याने केवळ १७ चेंडूत अर्धशतक केले. सूर्यकुमार यादवने आपल्या डावात ५२ धावा केल्या आणि डावाच्या शेवटी हार्दिक पंड्यानेही ६ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले.
MI vs RCB, IPL 2024 Highlights : मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी नवव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरुद्ध वरचष्मा राहिला आहे.
एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १५.३ षटकांत ३ गडी गमावून सामना जिंकला. मुंबईकडून तुफानी फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने १९ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. इशान किशनने ३४ चेंडूत ६९ धावा केल्या. रोहित शर्माने ३८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २१ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान आरसीबीकडून आकाश दीप, विजय कुमार विशाक आणि विल जॅकने प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. सूर्यकुमार यादव १९ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. मुंबईला विजयासाठी आता २१ धावांची गरज आहे.
सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत १७ चेंडूत अर्धशतक झळकावले. तो १८ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. मुंबईने १३ षटकात २ गडी गमावून १६९ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी फक्त २८ धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा २४ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. विल जॅकने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी आला आहे.
मुंबईच्या डावातील १० षटके पूर्ण झाली आहेत. संघाने १ गडी गमावून ११० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २२ चेंडूत ३४ धावा करून खेळत आहे. सूर्यकुमार यादव ५ धावा करून खेळत आहे. आकाश दीपने आरसीबीला एकमेव विकेट मिळवून दिली. त्याने २ षटकात २० धावा दिल्या आहेत. मुंबईला विजयासाठी ६० चेंडूत ८६ धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. इशान किशन ३४ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. आकाश दीपने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईची पहिली विकेट पडली. विराट कोहलीने इशानचा झेल घेतला. मुंबईने ८.५ षटकात १०१ धावा केल्या आहेत. रोहित २९ धावा करून खेळत आहे.
आरसीबीने आतापर्यंत ५ गोलंदाजांचा वापर केला असून एकही विकेट घेऊ शकलेले नाहीत. मुंबईसाठी रोहित आणि इशान शानदार फलंदाजी करत आहेत. १६ चेंडूत २६ धावा केल्यानंतर रोहित खेळत आहे. इशान ५६ धावा करून खेळत आहे. विशाकने १ षटकात १२ धावा दिल्या आहेत. आकाश दीपने १ षटकात ९ धावा दिल्या आहेत. आता विल जॅक गोलंदाजीला आला आहे.
https://twitter.com/india__humanity/status/1778468109357048122
मुंबई इंडियन्सने ६ षटकात ७२ धावा केल्या आहेत. इशान किशनने शानदार फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. तो २५ चेंडूत ५५ धावा केल्यानंतर खेळत आहे. इशानने ६ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. रोहित १५ धावा करून खेळत आहे. आरसीबीकडून कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळवता आलेली नाही. मॅक्सवेलने एका षटकात १७ धावा दिल्या आहेत.
इशान किशनने टॉप्लीच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर सलग चौकार लगावले. इशान १५ चेंडूत २१ धावा करत खेळत आहे. तर रोहित ३ चेडूत १ धावा करत मैदानात आहे. ३ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २३ धावा आहे.
आरसीबीच्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित-इशानची जोडी मैदानात आहे. टॉप्लेच्या पहिल्या षटकात मुंबईने २ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य दिले आहे. दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी केली. त्याने २३ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद ५३ धावा केल्या. कार्तिकने या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. रजत पाटीदारने २६ चेंडूत ५० धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने ४० चेंडूत ६१ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. विराट कोहली ३ धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरर शून्यावर बाद झाले. अशाप्रकारे आरसीबीने २० षटकांत ८ विकेट गमावून १९६ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने मुंबईसाठी चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. आकाश मधवाल, श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आरसीबीच्या डावाचे शेवटचे षटक बाकी आहे. संघाने १९ षटकांत ८ गडी गमावून १७७ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक ३६ धावा करून खेळत आहे. आकाश दीप १ धाव घेऊन खेळत आहे. मुंबईसाठी गोलंदाजी करताना बुमराहने ४ षटकात २१ धावा देत ५ विकेट घेतल्या आहेत.
आरसीबीने १८ षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक ३० धावा करून खेळत आहे. १७ चेंडूंचा सामना करताना त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. सौरव चौहान ७ धावा करून खेळत आहे. मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी बोलावले आहे.
बुमराहने या डावात तिसरी विकेट घेतली. त्याने पहिल्याच चेंडूवर लोमरला बाद केले. लोमरोर शून्यावर बाद झाला. आरसीबीने १६.५ षटकात ६ गडी गमावून १५३ धावा केल्या आहेत. आता सौरव चौहान फलंदाजीसाठी आला आहे. तत्पूर्वी फाफ डू प्लेसिस शानदार खेळीनंतर बाद झाला.
https://twitter.com/SportsTrendsCan/status/1778448838862205147
दिनेश कार्तिकने आकाश मधवालवर तीन चौकार मारले. तो १४ चेंडूत २२ धावा केल्यानंतर खेळत आहे. डुप्लेसिस ५९ धावा करून खेळत आहे. आरसीबीने १६ षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या आहेत. आकाशचे शेवटचे षटक महागडे ठरले. त्याने १९ धावा दिल्या.
https://twitter.com/cric_insiderr/status/1778446304911446359
फाफ डू प्लेसिसने यंदाच्या हंगामातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले आहे. ३३ चेंडूत ५० धावा केल्यानंतर तो खेळत आहे. डु प्लेसिसने ४ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. दिनेश कार्तिक ५ धावा करून खेळत आहे. आरसीबीने १४ षटकांत ४ गडी गमावून १२१ धावा केल्या आहेत. मुंबईने पुन्हा एकदा श्रेयस गोपालकडे जबाबदारी सोपवली आहे. त्याला एक विकेट मिळाली आहे.
आरसीबीची चौथी विकेट ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने पडली. त्याला खातेही उघडता आले नाही. श्रेयस गोपालने मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आरसीबीने १२.२ षटकात ४ गडी गमावून १०८ धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस ४२ धावा करून खेळत आहे.
आरसीबीला मोठा झटका बसला. रजत पाटीदार २६ चेंडूत ५० धावा करून बाद झाला. त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फाफ डू प्लेसिस ४१ धावा करून खेळत आहे. आरसीबीची धावसंख्या १०५ धावांवर पोहोचली आहे.
https://twitter.com/HirenGohil38507/status/1778438941210997242
आरसीबीच्या डावातील १० षटके पूर्ण झाली आहेत. संघाने २ गडी गमावून ८९ धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस ३९ धावा करून खेळत आहे. रजत पाटीदार ३६ धावा करून खेळत आहे. मुंबईचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत. डु प्लेसिस आणि पाटीदार यांच्यात ६६ धावांची भागीदारी झाली.
आरसीबीसाठी डुप्लेसिस आणि पाटीदार यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. या दोघांनी ५३ धावांची भागीदारी केली आहे. पाटीदार २६ धावा करून खेळत आहे. डुप्लेसिस ३८ धावा करून खेळत आहे. आरसीबीने ९ षटकात ७६ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/nishadkulkarni/status/1778433441723519136
फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदार चांगली फलंदाजी करत आहेत. डुप्लेसिस ३६ धावा केल्यानंतर खेळत आहे. पाटीदार १९ धावा करून खेळत आहे. या दोघांमध्ये ४४ धावांची भागीदारी आहे. आरसीबीने ८ षटकात ६७ धावा केल्या आहेत. मुंबईचे गोलंदाज विकेट्सच्या शोधात आहे.
पॉवरप्ले संपला आहे. आरसीबीने दोन गडी गमावून केवळ ४४ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने संघाला पहिला धक्का दिला. त्याने विराट कोहलीला १४ धावांवर बाद केले. त्याचवेळी या सामन्यात पदार्पण करणाऱ्या विल जॅकला आकाश मधवालने बाद केले. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सध्या कर्णधार डु प्लेसिस आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.
https://twitter.com/cric_insiderr/status/1778431840086553068
आरसीबीकडून या सामन्यात पदार्पण करणारा विल जॅक आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो आकाश मधवालचा बळी ठरला. आरसीबीला हा दुसरा धक्का आहे. चार षटकांनंतर संघाची धावसंख्या २८/२ आहे.आरसीबीला दुसरा धक्का, पदार्पणाच्या सामन्यात ८ धावा करून जॅक बाद झाला.
मुंबईचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने विराट कोहलीला आपला बळी बनवला. त्याने किंग कोहलीला पाचव्यांदा पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या अनुभवी फलंदाजाला या सामन्यात केवळ तीन धावा करता आल्या. विल जॅक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या १८/१ आहे.
मुंबई इंडियन्सने पहिले षटक फिरकीपटूला दिले. मोहम्मद नबीने खूप चांगले षटक टाकले. या षटकात आरसीबीने ७ धावा केल्या. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोहलीने चौकार मारला. कोहली ५ धावा आणि डुप्लेसिस २ धावांसह खेळत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
https://twitter.com/IPL/status/1778418386076160276
मुंबई इंडियन्सच: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल
आरसीबीने विल जॅकचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तो आपला पदार्पण सामना खेळणार आहे. विराट कोहलीने आरसीबीची कॅप विल जॅकला दिली. जॅक्सचा आतापर्यंत टी-२० सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत फॅफ डुप्लेसिसचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. या सामन्यात मुंबई एका बदलासह खेळताना दिसणार आहे. कर्णधार पंड्याने सांगितले की, पीयूष चावलाच्या जागी श्रेयस गोपालचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी आरसीबी तीन बदलांसह खेळताना दिसणार आहे. विल जॅक, महिपाल लोमरोर आणि विजयकुमार व्यासक यांना संघात संधी मिळाली आहे.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.
https://twitter.com/RCBTweets/status/1778339495630516661
आरसीबी: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सौरव चौहान, रीस टोपली, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
कोहली आणि बुमराह जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात,तेव्हा दोघांमध्ये रंजक स्पर्धा पाहायला मिळते. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर कोहलीने बुमराहविरुद्ध १५२.१७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याचबरोबर बुमराहने आयपीएलमध्ये चार वेळा कोहलीलाही आपला बाद केले आहे. उभय संघांमधील या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा कोहली आणि बुमराहवर असतील आणि कोण कोणावर मात करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.