Sanju Samson Statement on RR Defeat: आयपीएल २०२४ च्या सुरूवातीपासून टेबल टॉपर असलेल्या राजस्थानची कामगिरी सध्या खालावली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा बुधवारी सलग चौथा पराभव झाला. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ७ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार सॅमसन नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

आयपीएल २०२४ च्या ६५व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ गडी गमावून १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १८.५ षटकांत पाच गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. हा पराभव राजस्थानसाठी धक्कादायक होता कारण त्यांना प्लेऑफमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळणे कठीण वाटत आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाच्या सलग चौथ्या पराभवावर चिंता व्यक्त केली. सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्धचा सामना कुठे गमावला हेही सांगितले. सॅमसनलाही या सामन्यात एका गोलंदाजाची उणीव जाणवली.

IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
Tom Kohler Cadmore Wears Q Collar Band in RR vs PBKS Match
RR v PBKS: टॉम कोहलर कॅडमोर गळ्यात नेमकं काय घालून उतरला होता? त्या उपकरणाचा उपयोग काय, जाणून घ्या
RCB or CSKWhich Team Will Reach Playoffs if Match Called off Due to Rain
RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?
Why Harshal Patel not celebrated MS Dhoni Wicket
IPL 2024: हर्षल पटेलने धोनीचा त्रिफळा उडवल्यानंतर सेलिब्रेशन का केलं नाही? स्वत: सांगितलं मोठं कारण
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

हेही वाचा- RR v PBKS: टॉम कोहलर कॅडमोर गळ्यात नेमकं काय घालून उतरला होता? त्या उपकरणाचा उपयोग काय, जाणून घ्या

RR च्या पराभवानंतर संजू सॅमसनचे मोठे वक्तव्य

संजू सॅमसन सामन्यानंतर बोलताना म्हणाला, “आणखी काही धावा करणे आवश्यक होते. कदाचित आम्ही १०-१५ धावा कमी केले. १६० धावांच्या आसपास ही विकेट होती. आम्ही सहज १६० पेक्षा जास्त धावा बनवू शकलो असतो आणि इथेच आम्ही सामना हरलो. दुसरा चांगला गोलंदाजीचा पर्याय असता तर त्याची मदत झाली असती. पण मला ५ गोलंदाजांसोबत खेळण्याची सवय आहे.”

राजस्थान रॉयल्सचा चौथा पराभव झाल्यानंतर कर्णधार संजू म्हणाला – “आम्हाला पराभवाचा सामना करावा लागत आहे, आम्ही सलग चार सामने गमावले आहेत. एक संघ म्हणून काय चूक होत आहे हे शोधून काढले पाहिजे. कोणीतरी पुढे येऊन जबाबदारीने खेळण्याची गरज आहे. आमच्या संघात असे अनेक मॅचविनर्स खेळाडू आहेत. या मोसमात आम्ही सातत्याने अशा विकेटवर खेळलो नाही जिथे २०० पेक्षा जास्त धावा सहज होतात. पण इथे आपल्याला हुशारीने क्रिकेट खेळायचे होते आणि भागीदारी रचणं गरजेचं होतं. येत्या सामन्यांमध्ये निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आशा आहे.”

हेही वाचा- RCB vs CSK सामन्यावर पावसाचे सावट, पावसामुळे मॅच रद्द झाल्यास कोणता संघ IPL मधून बाहेर होणार?

पंजाबचा कर्णधार सॅम करन (नाबाद ६३) याच्या झटपट अर्धशतकामुळे पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना राजस्थानने ९ बाद १४४ धावा केल्या. पण संथ खेळपट्टीवर हा टप्पा गाठण्यासाठी पंजाब किंग्जला खूप संघर्ष करावा लागला आणि त्यांनी १८.५ षटकांत पाच गडी गमावून १४५ धावा केल्या.