ENG vs NZ 2nd Test Match Updates: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे प्रत्येक सामन्यात तो एकतर मोठा पराक्रम करत आहे किंवा विक्रम मोडत आहे. ४० वर्षीय अँडरसनने आता गुरुवारी आणखी एक टप्पा गाठला आहे. कसोटीतील दुसऱ्या डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या बाबतीत श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुरलीधरनचा विक्रम मोडला आहे.

अँडरसनने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर हा पराक्रम केला. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तीन गडी बाद केले. अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत दुसऱ्या डावात २३१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी मुरलीधरनने दुसऱ्या डावात २२८ विकेट घेतल्या आहेत. मात्र, पहिल्या आणि तिसऱ्या डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अजूनही मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने पहिल्या डावात २३० आणि तिसऱ्या डावात २३६ विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १३८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. विशेष म्हणजे मुरलीधरनने (८००) कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या खालोखाल वॉर्न (७०८) तर अँडरसन (६८५) तिसऱ्या स्थानावर आहे.

वेलिंग्टन कसोटीबद्दल बोलायचे तर, शनिवारी इंग्लंडने पहिला डाव ४३५/८ धावांवर घोषित केला. जो रूटने नाबाद १५३ आणि हॅरी ब्रूकने १८६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने चार विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा संघ मोठ्या धावसंख्येसमोर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याची सुरुवात चांगली झाली नाही. अँडरसनने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला (०) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हेही वाचा – IND vs AUS: ‘हरताना पाहणे वाईट होते पण…’, Harmanpreet Kaur ने पराभवानंतर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिले ‘हे’ वचन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने केन विल्यमसन (४) आणि विल यंग (२) यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्याच्याशिवाय जॅक लीचने तीन आणि स्टुअर्ट ब्रॉडने एक बळी घेतला. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला. तोपर्यंत ४२ षटकांत न्यूझीलंडची धावसंख्या १३८/७ अशी होती. टॉम ब्लंडेल (२५) आणि कर्णधार टिम साऊदी (२३) नाबाद आहे.