MS Dhoni salary will be reduced by three times for IPL 2025 : आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंसाठीचे नियम आणि रिटेनशन स्कीम मजबूत करण्याच्या प्रक्रियेदरम्यान धोनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. असे मानले जाते की बीसीसीआय आयपीएल २०२५ च्या आधी खेळाडूंसाठी नियम जाहीर करताना महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत ठेवू शकते. अनकॅप्ड खेळाडूं कसा ठरवला जातो आणि त्याचे मानधन किती असते? याबद्दल जाणून घेऊया.

धोनीच्या मानधनात होणार मोठी कपात?

अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नसली तरी वृत्तानुसार बीसीसीआय जुना नियम परत आणू शकते. या नियमानुसार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले जाईल. यामुळे धोनी निश्चितपणे आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार असल्याचेही स्पष्ट होईल. हा नियम याआधीही अस्तित्वात होता, पण तेव्हा तो वापरला गेला नाही. मात्र आता तो नियम परत आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. कॅप्ड खेळाडू असताना, धोनीला सीएसकेकडून प्रत्येक मोसमात १२ कोटी रुपये मानधन मिळत होते, पण जर त्याला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले तर त्याचे मानधन ४ कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो.

Surya Transit In Scorpio :
Surya Gochar : सूर्य करणार वृश्चिक राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार; मिळणार अपार धनलाभ अन् बक्कळ पैसा
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
Shani Nakshatra Gochar
दिवाळीपूर्वी शनिची चाल बदलणार, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश अन् अपार धनलाभ
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
spy cam in delhi
Spy Cam: तरुणीच्या बाथरूम व बेडरूमच्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा; घरमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, दोन लॅपटॉपमध्ये सापडले Video!
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
EY Employee Death News
EY Employee Death : “मॅनेजर क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाचं वेळापत्रक बदलायचे, म्हणून…”, ॲनाच्या वडिलांचा गंभीर आरोप

काय आहे अनकॅप्ड खेळाडूचा नियम?

वास्तविक, २००८ ते २०२१ दरम्यान, आयपीएलमध्ये असा नियम होता की ५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या क्रिकेटपटूला आयपीएल लिलावात अनकॅप्ड खेळाडूसह समाविष्ट केले जाऊ शकते. गेल्या महिन्यात ३१ तारखेला आयपीएल संघ मालक आणि आयपीएल प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत रिटेनशनचा जुना नियम परत आणण्याची सूचना करण्यात आली, त्याला अनेक फ्रँचायझी मालकांनी विरोध केला होता. मात्र, आता टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सीएसके व्यवस्थापनाला दिलासा मिळू शकतो.

हेही वाचा – Natasa Stankovic : हार्दिक-जास्मिनच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केली इन्स्टा स्टोरी; म्हणाली, ‘योग्य वेळ आल्यावर देव…’

सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन काय म्हणाले?

जर बीसीसीआयने अनकॅप्ड खेळाडूचा जुना नियम लागू केल्यास धोनीला रिटेन करणे सीएसकेसाठी फायदेशीर ठरेल. पूर्वीच्या रिटेन्शन नियमांनुसार, अनकॅप्ड खेळाडूला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन करता येऊ शकते. सीएसकेने आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात धोनीला रिटेन करण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च केले होते. २०२५ च्या आयपीएल लिलावात धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून गणले जाईल का असे विचारले असता, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की त्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही. याबाबत त्यांनी कोणतीही विनंती केलेली नाही. बीसीसीआयने त्याला सांगितले आहे की ‘अनकॅप्ड प्लेयर रूल’ ठेवता येईल.

हेही वाचा – Preity Zinta : पंजाब किंग्जच्या संघमालकांमधील वाद चव्हाट्यावर, प्रीती झिंटाने उच्च न्यायालयात घेतली धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएल २०२४ मध्ये हे स्पष्टपणे दिसले की धोनीला गुडघ्याची समस्या आहे, तरीही तो संपूर्ण हंगाम खेळत राहिला. पण या दुखापतीमुळे तो अनेकदा सातव्या किंवा खालच्या फळीत फलंदाजी करताना दिसला. त्या दुखापतीमुळे धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु अधिकृत दुजोरा न मिळाल्याने धोनीला खेळताना पाहण्याच्या चाहत्यांच्या आशा कायम आहेत.