Rohit Sharma, IND vs WI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. टीम इंडियाला मालिका २-०ने जिंकण्याची संधी होती पण पावसाने खोडा घालत विजयाची संधी हुकवली. शेवटच्या दिवशी पावसाने खराब खेळ केला आणि सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाला यामुळे नुकसान सोसावे लागले आणि टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली.

आता अलीकडच्या येत्या काही दिवसात भारताला कोणतीही कसोटी मालिका खेळायची नाही. टीम इंडिया आता थेट डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. WTC मध्ये भारताला ८ गुणांचे नुकसान झाले. हे सर्व पावसामुळे झाल्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा खूप नाराज झाला. याबाबत त्याने ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. यावरून तो खूप नाखुश असल्याचे दिसत आहे.

रोहितने तीन शब्द ट्वीट केले. हिटमॅनने पुढे लिहिले की, “ हे मुंबई की त्रिनिदाद?” त्यात त्याने आकाशाकडे बघत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी कॅरेबियन आणि मुंबईच्या हवामानाची तुलना केली आहे. वेस्ट इंडीजमध्ये खरे तर हा पावसाचा हंगाम नाही पण तरी त्रिनिदादमध्ये सोमवारी दिवसभर पाऊस पडला. यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. मुंबई ही मुसळधार पावसासाठीही ओळखली जाते. अलीकडच्या काळात मुंबईत खूप पाऊस झाला. अशा स्थितीत रोहितने पावसाबद्दल टोमणा मारला. यासोबतच त्याने सामन्यादरम्यानचा पावसाचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित-कोहलीसह सर्व खेळाडू उभे आहेत.

भारताचा कर्णधार रोहितने कबूल केले की, “पाचव्या दिवशी संघाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास होता पण पावसाने आमच्या हातून विजयाची संधी हिसकावून घेतली.” यामुळे भारताचे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत स्थानही गडबडले, परिणामी पाकिस्तानला पहिल्या कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर पुन्हा अव्वल स्थान मिळवण्यात मदत झाली.

हेही वाचा: IND vs WI ODI: भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; होल्डर, पूरनसह अनेक मोठ्या खेळाडूंना दिला डच्चू

सामन्यानंतर रोहित पुढे म्हणाला, “आम्ही चांगला खेळलो पण दुर्दैवाने आम्ही विजय मिळवू शकलो नाही. आम्ही सकारात्मक हेतूने खेळायला आलो होतो मात्र, पावसाने अंतिम निकाल दिला. आम्हाला विजयाची पूर्ण खात्री होती. शेवटी फलंदाजी करणे किती कठीण असते हे तुम्हाला माहीत आहे. वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ठेवलेली धावसंख्या पुरेशी होती. तिथे विरोधी संघ पोहचू शकला नसता. खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना फारशी काही मदत दिली नाही, परंतु नशिबाने आमची साथ दिली नाही आणि पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला, हे आमच्यासाठी दुर्दैवी आहे.”

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला. अशा स्थितीत टीम इंडियाला १८३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव २ बाद १८१ धावा करून घोषित केला आणि एकूण ३६४ धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला ३६५ धावांचे लक्ष्य मिळाले.

हेही वाचा: Sunil Gavaskar: विराट-रोहितच्या जागी तरुणांना का संधी देत नाहीत? गावसकरांचा संतप्त सवाल; म्हणाले, “विंडीजविरुद्ध धावा केल्याचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही १००वी कसोटी होती. रविवारचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजच्या २ बाद ७६ धावा झाल्या होत्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्याला २८९ धावांची गरज होती. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज होती. मात्र, एकही खेळ होऊ शकला नाही. अशा स्थितीत भारताला १-० वर समाधान मानावे लागले. पावसामुळे वेस्ट इंडिज क्लीन स्वीपपासून वाचला.