भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या  तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. आठ षटकांच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला ९० धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने स्वतः जबाबदारी घेत आक्रमक ४६ धावा करून संघाला ६ गडी राखून विजयी केले. यासह तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. रोहितच्या तुफानी फटकेबाजीने भारताला मिळवून दणदणीत विजय दिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाच्या ९१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने दणक्यात सुरुवात केली, सुरुवातीपासूनच रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. यावेळी जुना हिटमॅन पुन्हा एकदा पाहायला मिळला. पण दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल हा झटपट बाद झाला. राहुलने यावेळी १० धावा केल्या. राहुलनंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने दमदार सुरुवात केली. पण यावेळी ११ धावांवर तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. पण यावेळी रोहित मात्र खेळपट्टीवर ठाम उभा होता आणि विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो सज्ज असल्याचे पाहायला मिळत होते.

अक्षर पटेलने टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीकडून कॅमेरून ग्रीनचा सीमारेषेवर झेल सुटला. पण, पुढच्याच चेंडूवर विराट व अक्षरने त्याला रन आऊट करून ऑसींना पहिला धक्का दिला. अक्षरने अखेरच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेला (०) आणि पुढच्या षटकात टीम डेव्हिडला (२) बाद केले. त्याने २ षटकांत १३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला अन् स्टेडियममध्ये नावाचा गजर घुमला. बुमराहने त्याच्या षटकाच्या अखरेच्या चेंडूवर भन्नाट यॉर्कर टाकून फिंचचा त्रिफळा उडवला. ऑसी कर्णधार १५ चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल वैयक्तिक १०, विराट कोहली ११ व सूर्यकुमार यादव शून्य धावांवर बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत रोहितने संयम न गमावता आपली लढाई सुरू ठेवली. हार्दिक पंड्यादेखील ९ धावांचे योगदान देऊ शकला. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत भारताचा विजय जवळपास नक्की केला. पुढच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने संघाला विजय मिळवून दिला. रोहितने अखेरपर्यंत नाबाद राहत ४६ धावांची खेळी केली. भारताने हा सामना चार चेंडू राखून आपल्या नावे केला.