scorecardresearch

Premium

सौरव गांगुलीचे टीम इंडियाबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, आशिया चषक आणि विश्वचषकासाठी ‘या’ दोन खेळाडूंवर अवलंबून

Sourav Ganguly’s reaction on Virat-Rohit: आशिया चषक २०२३ मध्ये टीम इंडियाची कामगिरी मोठ्या प्रमाणावर रोहित आणि विराटवर अवलंबून असेल. या स्पर्धेतील पहिला सामना टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

All defenses on Virat-Rohit's performance according to Ganguly
टीम इंडिया (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Virat Kohli will be India’s key player for Asia Cup and World Cup along with Rohit Sharma: माजी कर्णधार सौरव गांगुलीने आशिया चषक आणि बहुप्रतिक्षित २०२३ विश्वचषकापूर्वी विराट आणि रोहितच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. टीम इंडिया आशिया चषक २०२३ मध्ये २ सप्टेंबर रोजी कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

दरम्यान, आशिया चषकातील त्यांच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी, गांगुलीने टीम इंडियाच्या सेटअपबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला, आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेसाठी कर्णधार रोहितसह कोहली टीम इंडियाचे आवडते खेळाडू असतील.

Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली
19th asian games 2023 updates
Asian Games: भारत-बांगलादेश सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
India vs Korea Hockey: Indian women's hockey team reached the semi-finals the match was drawn 1-1 against South Korea
Asian Games, IND vs KOR: भारतीय महिला हॉकी संघाने गाठली उपांत्य फेरी, दक्षिण कोरियाविरुद्ध साधली १-१ अशी बरोबरी
IND vs PAK: Pakistan is a weaker team than India Waqar Younis before India vs Pakistan World Cup clash
Waqar Younis: विश्वचषक २०२३च्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वकार युनूसचे सूचक विधान; म्हणाला, “टीम इंडियाच्या तुलनेत आम्ही…”

विराट आणि रोहितवर बरेच काही अवलंबून असेल –

रेव्ह स्पोर्टशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “विराट कोहली खूप चांगला खेळत आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आगामी स्पर्धेत रोहित शर्मासह तो भारताची ताकद आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू असेल. रोहितचा फॉर्मही तितकाच महत्त्वाचा असेल. गेल्या विश्वचषकात (२०१९) त्याने पाच शतके झळकावली होती आणि आगामी विश्वचषकातही तो याच कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो.”

हेही वाचा – IND vs PAK: विराट कोहलीच्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या खेळीचा फ्लॅशबॅक पाकिस्तानचा तणाव वाढवणार, माजी खेळाडूचं वक्तव्य

तो पुढे म्हणाला, “कदाचित कर्णधार म्हणून हा त्याचा पहिला आणि शेवटचा विश्वचषक असेल. जरी तो अजूनही टी-२० विश्वचषकात हे करू शकतो, पण एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून चार वर्षे आहेत. मला वाटत नाही की तो इतका वेळ खेळू शकेल. या विश्वचषकात प्रत्येकजण महत्त्वाचा असेल आणि मला आशा आहे की ते उभे राहून कामगिरी करतील.”

हेही वाचा – Asia Cup 2023: बाबर आझमच्या यशामागे विराट कोहलीचा हात, पाकिस्तानच्या कर्णधाराने स्वत: केला खुलासा, पाहा VIDEO

आशिया कप (वनडे फॉरमॅट) मध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये टीम इंडियासाठी रोहित आणि कोहली सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. या यादीत रोहितने २२ सामन्यात ७४५ धावा केल्या आहेत, तर कोहलीने केवळ ११ सामन्यात ६१३ धावा केल्या आहेत. कोहली वनडेत १३ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यास अवघ्या १०२ धावांनी दूर आहे. आशिया चषक २०२३ मध्ये तो ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sourav ganguly says virat kohli will be indias key player for asia cup and world cup along with rohit sharma vbm

First published on: 31-08-2023 at 17:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×