छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संपूर्ण टीम आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माचे विनोद ऐकून सर्वांना हसू अनावर होते. या कार्यक्रमात सिनसृष्टीसह अनेक क्षेत्रातील मंडळी हजेरी लावत असतात. नुकतंच या शो मध्ये टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी हजेरी लावली. याबाबतचा एक प्रोमो नुकतंच सोनी टीव्हीने शेअर केला आहे.

सोनी टीव्हीने शेअर केलेल्या या व्हिडीओ कपिल हा दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांचे स्वागत करताना दिसत आहे. या शोदरम्यान कपिल शर्मा शिखर धवन आणि पृथ्वी शॉसोबत विविध विनोद करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यासोबत तो या दोघांना मैदानात आणि मैदानाबाहेरील अनेक मजेशीर प्रश्नही विचारत असल्याचे दिसत आहे.

“…आणखी काय पाहिजे!”, किरण माने साकारणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

यावेळी कपिल शर्मा हा पृथ्वी शॉचे विशेष आभार मानतो. तसा या कार्यक्रमात शिखरही आला आहे. पण पृथ्वी हा शाळा सोडून इथे आला आहे. त्यामुळे त्याचे विशेष आभार, असे म्हणत कपिल त्याची मस्करी करु लागतो. यादरम्यान कपिल पृथ्वीला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारतो. तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न कपिल त्यावेळी पृथ्वीला विचारतो. यावर पृथ्वी त्याला नाही असे उत्तर देतो. हे उत्तर देताना तो त्याच्या ओठांवर जीभ फिरवतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर कपिल पटकन म्हणतो, ‘जर तुझी गर्लफ्रेंड नाही तर मग तू ओठांवर जीभ का फिरवलीस?’ कपिलाचा हा प्रश्न ऐकून शिखर धवन, पृथ्वीसह सर्वजण जोरजोरात हसू लागतात. सध्या हा संपूर्ण व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.