Alick Athanaze Fastest Fifty on ODI Debut: पहिल्याच वनडे सामन्यात वेस्टइंडिजचा फलंदाज एलिक अथानाजेनं शानदार अर्धशतकी खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झाला. एलिकने वनडे डेब्यूमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. अशी चमकदार कामगिरी करून एलिकने भारताच्या कृणाल पांड्याची बरोबरी केली आहे. कृणालने त्याच्या डेब्यू सामन्यात २६ चेंडूत अर्धशतकी खेळी करत कमाल केली होती. आता अथानाजेनेही त्याच्या पहिल्याच वनडे सामन्यात अर्धशतक ठोकून इतिहास रचला आहे.
आताच्या घडीला या दोन्ही फलंदाजांशिवाय जगात तिसरा कोणताच फलंदाज नाही, ज्याने वनडे डेब्यू सामन्यात ३० हून कमी चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे. ईशान किशनने त्याच्या पहिल्या वनडे सामन्यात ३३ चेंडूत ५० धावा कुटल्या होत्या. एलिकने यूएईविरोधात तिसऱ्या वनडे सामन्यात ४५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. त्याने १४४.४४ च्या स्ट्राईक रेटने ६५ धावा केल्या आणि गोलंदाजांची खूप धुलाई केली. हा सामना वेस्टइंडिजने ४ विकेट्सने जिंकला.
इथे पाहा व्हिडीओ
डेब्यू वनडे सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज
क्रुणाल पांड्या, 26 चेंडू, vs इंग्लैंड, 2021
एलिक अथानाजे, 26 चेंडू, vs यूएई, 2023
ईशान किशन, 33 चेंडू, vs श्रीलंका 2021
रोलॅंड बचर, 35 चेंडू, vs ऑस्ट्रेलिया 1980
जॉन मॉरिसन, 35 चेंडू, vs न्यूझीलंड 1990