Shai Hope said MS Dhoni told me that you have more time at the crease than you think : वेस्ट इंडिजने मायदेशातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. कर्णधार शाई होपने नाबाद शतक झळकावून वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना होपचे हे शतक आले. शतकासह इंग्लंडला पराभूत करणाऱ्या शाई होपने सामन्यानंतर सांगितले की, त्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या गुरुमंत्राची अंमलबजावणी कशी केली. सामना संपल्यानंतर वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने धोनीच्या सांगण्यावरुन क्रीजवर अधिक वेळ कसा घालवला हे सांगितले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत सर्वबाद ३२५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजसाठी शाई होपने ८३ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १३१.३३ होता. या शानदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने ४८.५ षटकांत ६ गडी राखून विजय मिळवला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सामना संपल्यानंतर होपने धोनीच्या गुरुमंत्राविषयी सांगितले. तो म्हणाला की, “हे शतक विजयात होते आणि यासाठीच मी खेळतो. आम्ही जिंकलो याचा मला आनंद आहे. मी काही वेळापूर्वी महेंद्रसिंग धोनीशी बोललो होतो. त्याने मला सांगितले होते की, तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा तुमच्याकडे क्रीजवर जास्त वेळ असतो आणि ते माझ्या लक्षात राहिले.”

हेही वाचा – IND vs AUS T20 Series : ऋतुराज गायकवाडने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम, इशान किशनलाही ‘या’ बाबतीत टाकले मागे

वेस्ट इंडिजचा कर्णधार या विजयाबद्दल पुढे म्हणाला, “शेफर्डनेही शानदार कामगिरी केली आणि आम्हाला विजय मिळाला. आता मालिकेची सुरुवात चांगली झाली असून पुढच्या सामन्यात त्याची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य आहे. सलामीवीरांनी चांगला खेळ केला. आम्हाला पुढच्या सामन्यात अजून चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा लागेल.”

इंग्लंडच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत –

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ सध्या अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. २०२३ मध्ये भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ अतिशय वाईट स्थितीत दिसला होता. इंग्लिश संघाला ९ पैकी केवळ ३ सामने जिंकता आले होते. इंग्लंडने बांगलादेश, नेदरलँड आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचलेल्या इंग्लंडला पराभवाने सुरुवात करावी लागली आहे.

Story img Loader