स्मार्टफोनने वापरकर्त्यांसाठी संवाद, ज्ञान आणि मनोरंजनाचे नवीन विश्व निर्माण केले आहे. मात्र, केवळ स्मार्टफोननिशी या विश्वातील भ्रमंती कठीण आहे. स्मार्टफोनशी संबंधित पूरक उत्पादने ज्यांना ‘अ‍ॅक्सेसरीज’ असे म्हटले जाते, त्या उत्पादनांचीही ‘स्मार्ट’ संचारासाठी मदत लागते. हेडफोनपासून पॉवरबँकपर्यंत आणि वेअरेबल गॅझेटपासून व्हच्र्युअल गिअपर्यंतच्या अनेक अ‍ॅक्सेसरीज स्मार्टफोनला अधिक स्मार्ट आणि शक्तिशाली बनवतात. या ‘अ‍ॅक्सेसरीज’चा ट्रेंड काय सांगतो?

भारतीय स्मार्टफोन क्षेत्र हे जगातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठे क्षेत्र आहे. स्मार्टफोन उद्योगक्षेत्राबरोबरच मोबाइल अ‍ॅक्सेसरीजच्या बाजारपेठेचीही समांतर भरभराट होत आहे. मोबाइल अ‍ॅक्सेसरीज म्हणजे केवळ संरक्षक केस किंवा मोबाइल कव्हर नव्हे तर यात हेडफोन, इअरफोन, पॉवर बँक, पोर्टेबल स्पीकर इत्यादींचाही समावेश आहे. तसेच मोबाइल अ‍ॅक्सेसरीज म्हणजे फक्त ठरावीक कामासाठी वापरायच्या गोष्टी नाहीत तर त्यापलीकडेही त्याचा विस्तार झाला आहे. स्टाइल, लूक, सुलभता यामुळे उपकरणांचा वापर आता अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य झाले आहे आणि यामुळे अ‍ॅक्सेसरीज बाजारपेठांना अधिक चालना मिळालेली आहे.

प्रत्येक कंपनी, बँड्र आजघडीला ‘मी टू’ उत्पादनांवर भर देत आहे. ‘मी टू’ उत्पादने म्हणजे, स्पर्धक कंपनीच्या उत्पादनांना स्पर्धा निर्माण करणारी उत्पादने. मोबाइल अ‍ॅक्सेसरीजच्या क्षेत्रातही ही स्पर्धा कट्टर होऊ लागली आहे. अत्याधुनिक/अपग्रेड झालेले तंत्रज्ञान व उपाययोजना दर्जामध्ये कोणतीही तडजोड करत नाहीत आणि यासाठी ठेवण्यात आलेल्या योग्य किमतींमुळे या वस्तूंना चालना मिळते आहे. नावीन्यपूर्णतेच्या नव्या सेटसह भारतीय मोबाइल अ‍ॅक्सेसरीजच्या बाजारपेठांमधील आव्हाने येत्या काही वर्षांत मर्यादित होणार आहेत. गोपनीयता, दर्जाचा अभाव, ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजचे उत्पादन आणि स्पर्धात्मक किमतीवर ठाम राहण्याची बंधने ही सेफगार्ड बाजारपेठेतील अडचणी आहेत.

अनपेक्षितपणे भारतीय अ‍ॅक्सेसरीज बाजारपेठा या अडचणींपलीकडे जाऊन संधी घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. मोबाइल अ‍ॅक्सेसरीज बाजारपेठांमधील विविध प्रकारची उत्पादने ज्या सवलती देतात, ऑडिओ आणि पॉवर बँकची उत्पादने पुरवतात, त्यांच्या केसेस सादर करतात या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मोबाइल अ‍ॅक्सेसरीजमधले प्रमुख ट्रेंड्स म्हणजे; पॉवर बँक होय, या उत्पादनाने बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. सध्या पॉवर बँक मोबाइलसाठी अतिशय महत्त्वाचा घटक बनला आहे. उच्चतम क्षमता, कमी वजन, बारीक आणि उत्तम लुक हे पाँवरबँकसाठीचे महत्त्वाचे निकष आहेत. आता उपकरणांना पॉवर देणे एवढेच फक्त पॉवर बँकचे काम उरलेले नाही, तर ती तुमच्या गॅजेटची स्टाइल अ‍ॅक्सेसरी झाली आहे. स्मार्टफोनमधील नव्यानव्या तंत्रज्ञानाला सेल्फी क्लिक बटण, एलईडी लाइट्स, टॉर्च, लवकरात लवकर चार्ज होणारी अशी वैशिष्टय़े पॉवरबँकच्या पसंतीत भर टाकत आहेत.

यापुढे वायरलेस तंत्रज्ञान हेच भविष्य असणार आहे. आजच्या घडीला वायरलेस तंत्रज्ञानाला पूर्णपणे महत्त्व आहे आणि ते सर्वात जास्त प्राधान्य मिळणारं तंत्रज्ञान ठरत आहे, याबरोबर कितीतरी ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी वापरलं जाणारं सर्वोत्तम तंत्रज्ञान असणार आहे. हे वायरलेस नेटवर्कचं तंत्रज्ञान जलद गतीने विस्तारणार आहे, ते अधिकाधिक स्मार्ट आणि सक्षम असेल. आज लोकांकडे वाया घालवायला वेळ उरलेला नाही आणि त्यांना त्या वायरींशी झगडायचंही नाही आहे.

वायरलेस उपकरणे आयओटी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशिवाय अपूर्ण आहेत. तसेच वेअरेबल गॅजेट उपकरणांनाही ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ आणि ‘आयओटी’ची गरज असते. या तंत्रज्ञानामुळे विविध उपकरणे अधिकाधिक स्मार्ट होऊ लागली आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये स्पर्धा आणि सुलभता दोन्ही गोष्टी वाढत आहेत. तरीही येत्या दशकामध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज बाजारात येतील आणि त्याचा परिणाम म्हणजे महसुलात वाढ होईल. भविष्यकाळात भारतीय वायरलेस उद्योगक्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. तसेच फारच कमी काळात भारतीय बाजारपेठेतील वायरलेस तंत्रज्ञानाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तर गाठणार याची फार मोठी शक्यता आहे. भारत आपल्या देशातील मोबाइल अ‍ॅक्सेसरीजच्या बाजारपेठांमधील वाढ आणि वायरलेस तंत्रज्ञानाचे भविष्य दोन्ही पाहणार आहे.

आशीष मुतनेजा

(लेखक काँटम हायटेक कंपनीचे सीईओ आहेत.)