01 March 2021

News Flash

कार्यात्मक द्रवे आणि वंगणे

इंजिनाची कार्यपद्धती त्यातील तापमानाचा विचार करून ह्यातील श्रेणी निवडली जाते.

(Functional  Fluids and Greases )

तंत्राचा मंत्र : उदयन पाठक

दुचाकींमध्ये सर्वसाधारणपणे तीन प्रकारची कार्यात्मक द्रवे आणि वंगणे वापरली जातात. इंजिन आणि गियरमध्ये तेलरूपी वंगण, अवरोधात वापरले जाणारे द्रव आणि धक्केरोधकामध्ये वापरले जाणारे द्रव. विशेष म्हणजे हे द्रव माणसाला दिसत नाही, पण वाहनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या दुचाकींमध्ये इंजिन आणि गियर बॉक्समध्ये एकच प्रकारचे द्रव वापरले जाते. इंजिनमधील दट्टय़ा (Piston) आणि सिलेंडर ब्लॉकमधील घर्षण कमी करण्यासाठी इंजिन द्रवाचा वापर करतात. ह्यात द्रवाच्या तरलतेप्रमाणे वर्गीकरण केले जाते. १० ह ४०, २० ह ४० ह्या श्रेणीतील द्रव जास्त प्रमाणात वापरले जाते.

इंजिनाची कार्यपद्धती त्यातील तापमानाचा विचार करून ह्यातील श्रेणी निवडली जाते. मूळ उत्पादकाने सुचविलेल्या वापरानंतर हे द्रव बदलणे गरजेचे आहे. बहुतेक दुचाकींमध्ये पहिल्या सव्‍‌र्हिसिंगच्या वेळी हे द्रव बदलण्याची सूचना असते. तदनंतर ५००० ते ५०००० किमी  वापरानंतर हे द्रव बदलण्याचे सुचविले जाते. ही द्रवे म्हणजे नैसर्गिक खनिज तेल आणि तरलता सुधारक ((Viscosity Modifier), प्रशालक (Detergent) , स्थिरीकरण इ. वापरले जाते. नवीन प्रकारात नैसर्गिक तेलाऐवजी कृत्रिम द्रावणाचा वापर पण केला जातो. निरनिराळ्या तेल कंपन्या यात संशोधन करून नवीन नवीन श्रेणींची द्रवे तयार करून बाजारात आणतात. वाहनाच्या मूळ उत्पादकाने सुचविलेल्या श्रेणीची द्रवे वापरणे आणि सुचविलेली द्रव बदलण्याची वारंवारिता (Change  Frequency) काटेकोरपणे पाळणे गरजेचे असते. इंजिन द्रवाचाच गियर बॉक्स द्रव म्हणून पण सामायिक उपयोग असतो. गियरच्या दोन दातांमधील घर्षण कमी करून वाहन ओघवते ठेवण्यात ह्याचा महत्त्वाचा भाग असतो. शिवाय घर्षण कमी झाल्याने गियरचे आयुर्मान पण वाढते.

अवरोधाची कार्यक्षमता वाढावी म्हणून तारेद्वारे (Cable  Operated) कार्यरत होणाऱ्या अवरोधांऐवजी द्रवावर आधारित अवरोध प्रणाली (Hydrauilc Brakes) आजकाल वापरली जाते. ह्यत ऊडळ ३,४,५ ह्य श्रेणीचे द्रव ओतले जाते. ह्यतील काही श्रेणीमध्ये थोडय़ा प्रमाणात पाणी मिसळले गेले तरी कार्यक्षमता टिकवून ठेवण्याची क्षमता असते. साधारणपणे १५० ते ३०० मिली इतके प्रमाण ह्य प्रणालीमध्ये असते. द्रवाचे प्रमाण हे अवरोधाच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास अवरोध न लागून अपघात होण्याची शक्यता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:09 am

Web Title: functional fluids and greases akp 94
Next Stories
1 नागभूमीची सफर   
2 शहर शेती : सुगंधी फुलांचे वेल
3 उत्सवाचे पर्यटन : जॅझ संगीत महोत्सव
Just Now!
X