21 September 2020

News Flash

5 जी नेटवर्क आणि दमदार फीचर्स; आता येतोय OnePlus 7

यामध्ये पॉप अप सेल्फी कॅमेराही असेल

स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु असून दिवसागणिक नवनवीन फोन लाँच होत आहेत. यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देऊन खूश करण्याचा प्रयत्न कंपन्या करत असतात. नुकतीच बाजारात दाखल झालेली OnePlus कंपनीही सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. कंपनीने आपला 5 जी नेटवर्क असलेला OnePlus7 हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा फोन प्रत्यक्ष बाजारात यायला वेळ लागणार असला तरीही बाजारात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसरसह स्मार्टफोन लाँच केला जाईल.

या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये पाच नवे फीचर्स असू शकतात. वनप्लस ६ आणि वनप्लस ६ टी या फोनमध्ये नॉच देण्यात आलं होतं. मात्र, वनप्लस ७मध्ये नॉच नसेल. या फोनमध्ये स्लायडर फ्रंट कॅमेरा असू शकतो असे बोलले जात आहे. तसेच यामध्ये पॉप अप सेल्फी कॅमेराही असेल, असं सांगितलं जातं. एचडीआर सपोर्टही असेल. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. तसेच यामध्ये असलेल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ‘Warp Charge ३०’मुळे हा फोन अतिशय वेगाने चार्ज होईल.

यावर्षी लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोनचे हे स्टँडर्ड फीचर असतील असा दावा कंपनीनं केला आहे. वनप्लस ७ मध्ये सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सरचा वापर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा असू शकतो. सर्वात आधी हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच केला जाईल, त्यानंतर तो इतर देशांमध्ये लाँच होईल. भारतात हा फोन केव्हा येणार याबाबत मात्र अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. तसेच या फोनच्या किमतीबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:19 pm

Web Title: oneplus 7 expected new exciting features in flagship 5 g phone
Next Stories
1 Realme C1(2019) चा पहिला सेल आज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2 व्होडाफोनची स्वस्तात मस्त ऑफर, ११९ रुपयांत…
3 सावधान..! लठ्ठपणामुळे १३ प्रकारच्या कर्करोगाचा धोका
Just Now!
X