24 January 2021

News Flash

PUBG Mobile India launch update : गुगल प्ले स्टोअरकडून मिळाला ग्रीन सिग्नल!

लवकरच होणार लाँच

PUBG Mobile India गेमची आतुरतेने वाट बघितली जात आहे. गेम नेमका कोणत्या तारखेला लाँच होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात PUBG Mobile India च्या लाँचिंगची घोषणा झाल्यापासून हा गेम बराच चर्चेत आहे. गेमबाबतचे अनेक रिपोर्ट्स सतत समोर येत आहेत.

लेटेस्ट रिपोर्टनुसार, PUBG Mobile India चा भारतात लाँच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. GEM Esports ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केलेल्या पोस्टनुसार, 24 नोव्हेंबर रोजी Google Play Store च्या रिव्ह्यू टीमला एक नोटिफिकेशन पाठवण्यात आलं होतं. यामध्ये डेव्हलपर्सनी PUBG Mobile India गेम अपलोड करताच गुगल प्ले स्टोअरवर हा गेम पब्लिश करण्याची प्रक्रीया जलदगतीने पार पाडावी अशी विनंती करण्यात आली होती. अॅप अपलोड होताच रिव्ह्यू साठी न थांबवता ते अॅप पब्लिश केलं जावं अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीला गुगलकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. गुगल प्ले-स्टोअरकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर GEM Esports ने हा गेम प्ले-स्टोअरवर अपलोड होताच लगेच पब्लिश होईल, अशी माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GEM Esports (@gem.esports)


दरम्यान, PUBG Mobile India हा गेम अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर एकाचवेळी लाँच होणार नाही अशीही चर्चा आहे. अन्य एका रिपोर्टनुसार, सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल, म्हणजे PUBG Mobile India ला गुगल प्ले स्टोअरवर सर्वप्रथम लिस्ट केलं जाईल. तर , iOS युजर्ससाठी हा गेम थोड्या दिवसांनी जारी केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, PUBG Mobile India कंपनीच्या रजिस्ट्रेशनला केंद्र सरकारने मंजुरी मिळाली आहे. पबजी कॉर्पोरेशनने PUBG India Private Limited नावाने कंपनी रजिस्टर केली आहे.

गेम नेमका कोणत्या तारखेला लाँच होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, रजिस्ट्रेशन आणि गुगल प्ले स्टोअरवर गेम पब्लिश करण्याबाबत आलेल्या लेटेस्ट रिपोर्ट्समुळे हा गेम लवकरच लाँच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 12:55 pm

Web Title: pubg mobile india launch update pubg mobile india app wont be held up at the google play store sas 89
Next Stories
1 Hero Passion Pro झाली महाग, जाणून घ्या बाइकची नवी किंमत
2 मुंबईच्या कंपनीने सुरू केलं ‘व्हॅक्सिन टुरिझम’, चार दिवस अमेरिकेत जाऊन घ्या करोनाची लस !
3 Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter; पाहा काय आहे खास
Just Now!
X