आधारकार्ड ही प्रत्येक व्यक्तीची अतिशय महत्त्वाची ओळख आहे. व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार आणि इतर गोष्टीही मोदी सरकारने आधार कार्डशी संलग्न केल्या आहेत. त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधार क्रमांक म्हणजे तुमचा युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक असतो. व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सध्या नाव, राहण्याचा पत्ता यांबरोबरच डोळे, फिंगरप्रिंट यांच्यावरुन ओळख पटविण्याचे काम केले जायचे. मात्र आता नव्याने चेहऱ्यावरुन व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे.

युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरीटी ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेहेऱ्यावरुन ओळख पटवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी डोळे आणि फिंगरप्रिंट हे व्यक्तीची ओळख पटण्यासाठी पुरेसे नाही. असे म्हटले होते. त्यामुळे या नवीन फिचरचा समावेश कऱण्यात आला आहे. वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुले यांच्या बाबतीत अनेकदा फिंगर प्रींटला अडचणी येतात. त्यामुळे आता हे नवीन फिचर लाँच केले जाणार आहे.

१ जुलैपासून हे नवीन फिचर लागू करण्यात येणार असून नव्याने आधारकार्ड काढणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. याबरोबरच आधारचा व्हर्च्युअल आयडी आता वेबसाईटवरुन तयार होईल. त्यामुळे सीमकार्ड किंवा इतर अनेक गोष्टींसाठी तुम्ही आधार क्रमांकाऐवजी चेहेऱ्यावरुन तुमची ओळख पटणार आहे.