आपण बऱ्याचदा हृदयविकाराचा त्रास हा फक्त वाईट आहार घेणाऱ्या किंवा व्यायाम न करणाऱ्या लोकांनाच होतो असे आपण समजतो. परंतु, दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागातील सल्लागार डॉ. संजीव कुमार गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आणि कारणं आहेत. विपरीत परिणाम होण्यास बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. हृदयाचे आरोग्य बिघडविण्यात हे दुर्लक्षित केलेले घटक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आता आपण त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे. चला जाणून घेऊयात आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या हृदयावर विपरीत परिणाम करतात.

१. अपुरी झोप धोकादायक

जर तुम्ही वारंवार उशिरापर्यंत जागे राहत असाल किंवा पुरेशी विश्रांती घेत नसाल तर तुम्ही तुमचे हृदय धोक्यात आणताय.

डॉ. गुप्ता स्पष्ट करतात : “झोपेची तीव्र कमतरता ही सामान्य गोष्ट नाही, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.” दररोज रात्री चांगली झोप घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. यावर तुमच्या हृदयाचे आरोग्य अवलंबून असते.

२. वायुप्रदूषणामुळे फुप्फुसांप्रमाणेच हृदयाचीही क्षती

आपल्याला माहीत आहे की घाणेरडी हवा धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास देते. पण, ती तुमच्या हृदयालाही इजा करते. “वायू प्रदूषणाच्या दररोजच्या संपर्कात, विशेषतः रहदारीमुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो,” असे डॉ. गुप्ता म्हणतात. जर तुम्ही शहरात किंवा वर्दळीच्या रस्त्यांजवळ राहत असाल, तर प्रदूषणाच्या सर्वाधिक वेळेचे तास टाळण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असेल तेव्हा घरी एअर फिल्टर वापरा.

३. नकारात्मक विचारांमुळे वाढणारा मानसिक ताण

विविध प्रकारची चिंता आणि त्यामुळे मनात रेंगाळणारे नकारात्मक विचार यांमुळे येणारा सततचा ताण कॉर्टिसोलची पातळी उच्च ठेवतो, ज्यामुळे दीर्घकालीन दाह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. या नकारात्मक विचारासह येणाऱ्या मानसिक ताणाचाही तुमच्या हृदयावर जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे चालणे, डायरी लिहिणे किंवा कोणाकडे तरी आपले मन मोकळे करून बोलणे आदींद्वारे मानसिक ताण कमी करून, तुम्ही तुमचे हृदय खरोखर दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता.

४. बिघडणारे मौखिक आरोग्य

आश्चर्यकारक पण खरे : दात स्वच्छ न ठेवल्यानं तुमच्या हृदयाला हानी पोहोचू शकते. तोंडी आरोग्य हे आणखी एक कारण आहे. उपचार न केलेले हिरड्यांचे आजार दाह वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

५. निरोगी खाणे नेहमीच प्रत्येकासाठी सोपे नसते

प्रत्येकाला ताजे अन्न उपलब्ध नसते आणि ही एक मोठी समस्या आहे. निरोगी पर्यायांची कमतरता असते, यामुळे हृदयावर परिणाम होतो,” असे डॉ. गुप्ता स्पष्ट करतात.

६. हृदयाच्या आरोग्यात तुमचे आतडे किती महत्त्वाचे आहेत

तुमचे पोट आणि तुमचे हृदय यांचा तुम्हाला वाटतो त्यापेक्षा जास्त जवळचा संबंध आहे. अनेकदा आतड्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे होणाऱ्या कोलेस्ट्रॉल, रक्तदाब व जळजळ या त्रासांचा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या कार्यावरही विपरीत परिणाम होतो. अधिक फायबर, आंबवलेले अन्न खाणे आणि प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित करणे केवळ पचनासाठी चांगले नाही, ते तुमच्या हृदयालादेखील मदत करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपले हृदय केवळ आहार आणि व्यायामापेक्षा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते; आपल्या दैनंदिन जीवनातील संपूर्ण परिसंस्था महत्त्वाची आहे.”