अनेक लोक डाएट कोलामध्ये शून्य कॅलरी आहेत, असा विचार करून तो अधिक प्रमाणात पितात. कृत्रिम गोडवा साखरेपेक्षा जास्त गोड असतो; ज्यामुळे ते सामान्य मिठाईची चव कमी करतात आणि तुम्हाला अधिक प्रमाणात घेण्याची सवय लावतात. पण डाएट कोला घेणं आरोग्यासाठी कितपत योग्य आहे, त्याच्या अतिवापरामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. याबाबतची सविस्तर माहिती डॉ. अंबरीश मिथल, चेअरमन, एंडोक्रायनोलॉजी आणि मधुमेह मॅक्स हेल्थकेअर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी दिली आहे; ती जाणून घेऊ.
डाएट कोला तुमच्यासाठी नियमित शीतपेयांप्रमाणे घातक असू शकतो का? यासंबंधी १५ निरोगी व्यक्तींवर केला गेलेला एक अभ्यास नुकताच प्रकाशित झाला. त्यामध्ये असे दिसून आले आहे की, आहार आणि नियमित जास्त प्रमाणात शीतपेय घेतल्यानंतर त्या लोकांच्या लाळेतील इन्सुलिनची पातळी एका तासाने वाढली. अभ्यासामध्ये लाळेमध्ये सर्वांत सामान्य कृत्रिम गोड पदार्थांपैकी एक असलेला एस्पार्टमचा घटकदेखील आढळून आला.
परंतु, कमी लोकांचा सहभाग आणि रक्तातील साखरेच्या पातळीबद्दलचा कोणताही डेटा नसल्यामुळे डॉक्टर अंबरीश मिथल यांनी सांगितले की, हा अभ्यास वास्तवात काहीही सिद्ध करीत नाही. अनेक वर्षांपासून संशोधक लाळेवर आधारित इन्सुलिनची चाचणी विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लाळेमध्ये इन्सुलिनची पातळी वाढल्याने काही प्रश्न निर्माण होतात.
डाएट कोलादेखील साखर वाढवू शकतो का?
डाएट शीतपेयाची विक्री केवळ मधुमेह असलेल्या लोकांसाठीच नव्हे, तर आरोग्याबाबत जागरूक असलेल्या सर्व व्यक्तींसाठीही
केली जाते. कारण- ते शीतपेय शून्य कॅलरी आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही. तसेच ते साखरेची पातळी नियंत्रित करून इन्सुलिनचा स्राव होत नाही, असा दावा करतात. मग, इन्सुलिन कुठून येतं? डाएट कोलामध्ये कर्बोदकं नसतात. कारण- त्यात शून्य कॅलरी असतात. मग, कोलामध्ये आणखी असं काही आहे का, जे प्रतिक्रिया म्हणून ट्रिगर करतं? याबाबतचा अभ्यास केला जाण्याची आपल्याला गरज आहे का?, असं डॉ. मिथल विचारतात. ते म्हणतात की, काही कृत्रिम गोड पदार्थ इन्सुलिन प्रतिरोध वाढवू शकतात याचे पुरावे आहेत. ‘नेचर जर्नल’मधील २०१७ च्या अभ्यासात असं आढळून आलं की, शक्यतो आतड्यांतील जीवाणूंची रचना बदलून एस्पार्टममुळे ग्लुकोजची पातळी वाढू शकते.
नियमित कोला घ्यावा का?
हे तुम्ही दररोज किती कोला पिता यावर अवलंबून आहे. जर एखादी व्यक्ती ही पेये नियमितपणे घेत असेल, तर डाएट कोला निवडणे चांगले. जेव्हा निवड नियमित कोला आणि आहार यांच्यादरम्यान असते तेव्हा, डाएट कोला घेणं योग्य ठरू शकतं. अर्थात, कोणताही कोला आरोग्यासाठी सर्वोत्तम नसतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
सामान्य कोलामध्ये जास्त प्रमाणात साखर
५०० मिलीमध्ये सुमारे १२ चमचे, पण डायट कोलामध्ये शून्य कॅलरीजचा दावा केला जातो. हे शून्य कॅलरी मार्क कृत्रिम गोडवा वापरून तयार केलं जातं. काही लोक जास्त प्रमाणात हा कोला पितात. कारण- त्यांना वाटतं की, ते कमी कॅलरी घेत आहेत. परंतु, यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि मधुमेह यांच्याशी संबंधित दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते. कृत्रिम स्वीटनर्स साखरेपेक्षा खूप गोड असतात. त्यामुळे ते सामान्य मिठाईची चव मंद करतात आणि तुम्हाला अधिक गोड खाण्याची इच्छा निर्माण करतात. मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी फक्त डाएट कोलाचं सेवन करणं चांगलं ठरू शकतं, असं डॉ. मिथल म्हणतात. तसेच निरोगी लोकांसाठी नियमित व्यायाम करणंदेखील चांगलं आहे.
हेही वाचा- वर्कआउटनंतर नारळाचे पाणी आणि प्रोटीनचे करा सेवन ; आरोग्यासाठी मिळेल फायदा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला…
तुम्ही तुमच्या अन्नात कृत्रिम गोडवा वापरू शकता?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी आणि जीवनशैलीतील आजारांना प्रतिबंध करण्याकरिता साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम गोडवा वापराविरुद्ध इशारा दिला होता. परंतु, अल्पावधीत काही वजन कमी होऊ शकते आणि बॉडी मास इंडेक्स (BMI)मध्ये घट होऊ शकते. कारण- कृत्रिम गोडवा कॅलरी कमी करतात. दीर्घकालीन परिणामांत मात्र ते वजन वाढण्याशी जोडले गेले आहेत, असंही WHO च्या अहवालात म्हटलं आहे.