How To Control Sugar Level: मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. डायबेटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबेटीसने ग्रासल्याचे दिसून येते.आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यांमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे येणारा थकवा अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखणे अधिक आव्हानात्मक बनवतो. काही देशी उपाय मधुमेह नियंत्रित करण्यासाठी औषध म्हणून काम करतात. जर मधुमेहाचे रुग्णांनी दररोज काही खास औषधी वनस्पतींचे सेवन केले, तर ते रक्तातील साखरेची पातळी सहजपणे नियंत्रित करू शकतात. एम्सचे माजी सल्लागार, साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झज्जर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मधुमेहावर गुणकारी असलेल्या पानांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया…

मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरयुक्त निरोगी आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदातही या भाजीला खूप महत्त्व आहे. कारण- त्यातून शरीराला अनेक आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. शेवग्याच्या पानांत व्हिटामिन्स ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन व फायबरचे प्रमाण जास्त असते. शेवग्याच्या पानांच्या नियमित सेवनाने आपल्या शरीराला पोषक घटक मिळतात आणि आपले आरोग्य चांगले राहते.

शेवगा ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. शेवग्याच्या शेंगा, पाने व फुलांची भाजी खाल्ल्यानं आरोग्यासंबंधीच्या कितीतरी समस्या दूर होतात. शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पानं, झाडाची मूळं या सर्वांमध्ये पोषक घटक आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्यांवर शेवगा गुणकारी ठरतो.

शेवग्याची पाने मधुमेह कसा नियंत्रित करतात?

अनेक संशोधनांत हे सिद्ध झाले आहे की, शेवग्याच्या पानांमध्ये आढळणारी इन्सुलिनसारखी प्रथिने रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकतात. या पानांमध्ये आढळणारी रसायने रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करण्यास मदत करतात. या पानांचे सेवन केल्याने शरीर जलद इन्सुलिन तयार करते, ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य राहते. मधुमेहविरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही पाने साखर केवळ सामान्य ठेवत नाहीत, तर रोगप्रतिकार शक्तीदेखील मजबूत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. सांगतात की, जर सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याची पाने खाल्ली, तर रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित करता येते. दररोज रिकाम्या पोटी शेवग्याची ५-६ पाने खाल्ल्याने रिकाम्या पोटीची साखर, तसेच जेवणानंतरची साखर सामान्य राहते.