आजकाल बदललेली जीवनशैली, जेवणामध्ये अयोग्य अन्नपदार्थांचा समावेश, तणाव यांमुळे अनेकजण मधुमेहाला बळी पडत आहेत. तर या आजाराला आपण बळी पडू नये यासाठी तरुण मंडळी तब्बेतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे जाणवते. तर ज्यांना हा आजार झाला आहे ते अधिक फिट राहण्याच्या प्रयत्नात असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

अमेरिकन डायबीटिज असोसिएशननुसार जर जेवल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण जर १८० mg/dl असेल तर हे सामान्य आहे. मधुमेह असणाऱ्यांची जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर रक्तातील साखरेची पातळी २५० mg/dl पेक्षा जास्त झाली तर समस्या उद्भवू शकते. रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित झाल्यास हृदय, किडनी, डोळे यांबाबतची गंभीर समस्या उद्भवू शकते.

जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी किती असावी?

  • जर ३० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मधुमेह असेल आणि जर ते इन्सुलिन घेत असतील तर, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी १८० mg/dl पर्यंत असावी
  • जेष्ठ व्यक्ती ज्यांना मधुमेह आहे पण ते इन्सुलिन घेत नाहीत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी १४० mg/dl असावी
  • गरोदर महिलांना जर टाईप १ किंवा टाईप २ मधुमेह असेल तर जेवणानंतर दोन तासांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ११० ते १४० mg/dl पर्यंत असावी.

Health Tips : ‘या’ खाद्यपदार्थांमुळे वाढतो Type 2 Diabetes होण्याचा धोका

जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू नये यासाठी करा हे उपाय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • वजन नियंत्रणात ठेवा आणि जीवनशैलीमध्ये बदल करा.
  • जेवणामध्ये जास्त मीठ आणि साखरेचा समावेश टाळा.
  • अमेरिकन डायबेटिज असोसिएशननुसार मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात प्रोटीन असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी मैदा, बटाटा, सफेद ब्रेड अशा पदार्थांचा समावेश टाळा.
  • जेवणानंतर जर रक्तातील साखरेचे प्रमाण २५०mg/dl पेक्षा जास्त झाले तर लगेच औषधं घ्या. जर असे नियमित होत असेल आणि औषध घेतल्यानंतरही रक्तातील साखरेची पातळी कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)