Lessons to be taught by Father to Child: वडील आपल्या मुलांबरोबर नेहमी कठोर वागतात. पण त्यांना आपल्या मुलांना स्वत:पेक्षा जास्त चांगली व्यक्ती बनवायचे असते. वडिल आपल्या मुलांच्या यशाच्या सुखासाठी नेहमी प्रयत्न करतात. पण दोघेही एकमेकांना मनातील गोष्टी सांगू शकत नाही. पण एक चांगला आणि आदर्श पिता होण्यासाठी तुम्ही आपल्या मुलांबरोबर मैत्री केली पाहिजे. त्यामुळे तुमची मुलं तुम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे गांभीर्याने घेतील आणि त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतील. आदर्श पिता होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना आयुष्यासंबधी अशा काही गोष्टी सांगाव्या लागतील ज्या आवश्यक आहे.
तुमच्या मुलांना आयुष्याबाबत या ५ गोष्टी नक्की शिकवा
ध्येय मोठे असावे
एक वडिल होण्याच्या नात्याने तुमचे हे कर्तव्य आहे की, तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी प्रोत्साहन द्या. त्यांनी आयुष्यामध्ये नेहमी मोठे ध्येय ठेवण्यास शिकवा. आपल्या मुलांना सांगा की, स्वप्न आणि ध्येय नेहमी आकाशात झेप घेण्यासारखे मोठे असावे. त्यांना शिकवा ध्येय हे आकाशातील ताऱ्यांप्रमाणे असेल पाहिजे. जरी पूर्ण झाले नाही तरी तुम्ही आयुष्यात प्रगती नक्की होईल.
चांगला नेता कसे व्हावे हे शिकवा
आपल्या मुलांना कुटांबाचे महत्त्व समजवा. त्यांना नात्यांचे महत्त्व शिकवा. कुटुंबामध्ये कोणाची काय भुमिका आहे, कोणाची काय जबाबदारी आहे आणि प्रत्येकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. या सर्व गोष्टी शिकवा. या सर्व गोष्टींचे महत्त्व समजवा. तसेच त्यांना सांगा की, एक चांगला नेत्यामध्ये काय गुण असावे आणि एक चांगला नेता होण्याचे आयुष्यात काय फायदे आहेत.
हेही वाचा – वडील आणि मुलामध्ये नाते कसे असावे? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
योग्य वळण लावा
आयुष्यात नैतिक मुल्य, संस्कार शिकवणे अत्यंत आवश्यक आहेत. मुलांना गप्पा गप्पांमध्ये योग्य गोष्टींची शिकवण द्या. त्यांना चांगली व्यक्ती होण्यासाठी हेच शिष्टाचार उपयोगी ठरतील. लोकांबरोबर बोलण्याची योग्य पद्धत, वागण्याची पद्धत, महिलांबरोबर वागण्याची पद्धत, मोठ्यांबरोबर कसे वागावे, इतरांचा आदर कसा राखावा या सर्व गोष्टी शिकवा.
जबाबदारीची जाणीव करून द्या
तुमच्या मुलांना आयुष्यात एक चांगली व्यक्ती व्हायला शिकवा. प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली पाहिजे. कमी वयामध्ये त्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा. आपल्या चुकांमधून शिकवा, चुका मान्य करायाला शिकवा, आपले काम स्वत: करायला शिकवा, घरातील सर्व कामांमध्ये मदत करायला शिकवा. अशा महत्त्वाच्या गोष्टी शिकवा.
हेही वाचा – मुलांना अभ्यास करायला आवडत नाही? मग ‘या’ टिप्स वापरुन पाहा; स्वत:हून पुस्तक घेऊन अभ्यास करतील
इतरांकडून प्रेरणा घ्यायला शिकवा
कमी वयात मुलं नेहमी कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला स्वत:चे आदर्श मानतात आणि त्यांची लाइफस्टाइल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा आई-वडिल मुलांना या गोष्टीसाठी अडवतात आणि ओरडतात. त्याऐवजी तुम्ही मुलांना त्यांच्या आयुष्यातून धडा घेण्याचा सल्ला द्या. मुलांना त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी गोष्टी सांगा. त्यांचा संघर्ष सांगा आणि मुलांना शिकवा की, एक दिवस ते देखील त्यांच्याप्रमाणे होऊ शकतात.