सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : चंद्र-हर्षलच्या युतियोगामुळे मन चंचल होईल. अस्वस्थता वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. असे केल्यास आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. नव्या जोमाने धडाडी दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताशी सहमत होणे कठीण जाईल. सहकारी वर्गाबरोबर खटके उडतील. शब्द जपून वापरा. नाती सांभाळा. जोडीदाराचा सल्ला फारच लाभदायक ठरेल. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील. मूत्रविकार सतावतील.

वृषभ : गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे ज्येष्ठ लोकांच्या ओळखीतून कामाला गती मिळेल. प्रगतिकारक ग्रहयोग आहे. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पनांचा स्वीकार कराल. सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याला अनेक अडचणींवर मात करत पुढे जावे लागेल. त्याला आपल्या सोबतीची आणि आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे असेल. पोटाचे आरोग्य सांभाळावे. वातविकार बळावतील.

मिथुन : चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे उत्स्फूर्तता वाढेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात कामाला गती येईल. एखादे अपयश पचवून निर्धाराने पुढे जाल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना अमलात आणण्याच्या कार्यात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून सर्वच अपेक्षा पूर्ण होतील असे गृहीत धरू नका. जोडीदाराच्या कामात आर्थिक समस्या येतील. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्याल. युरीन इन्फेक्शनचा त्रास बाळावेल.

कर्क : शुक्र-हर्षलच्या प्रतियोगामुळे काही कामं होता होता फिसकटतील. जुळून आलेल्या गोष्टींमध्ये काही ना काही बाधा येईल. नोकरी-व्यवसायात संशोधन, कला तसेच तंत्रज्ञान या क्षेत्रात कामामध्ये यश मिळवाल. सहकारी वर्गाची बुद्धिमत्ता कामी येईल. जोडीदारासह एकत्रितपणे कुटुंबासाठी नव्या योजना आखाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईकांकडून शुभवार्ता समजतील. रक्तातील घटक कमी-अधिक झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

सिंह : बुध-शनीच्या लाभ योगामुळे मेहनत, व्यवस्थापन आणि व्यवहार चातुर्य यांचा त्रिवेणी संगम होईल. कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे कामातील अडसर दूर होतील. सहकारी वर्गाची थोडीफार भुणभुण ऐकून घ्यावी लागेल. आस्थापनेच्या फायद्याचे ठरतील असेच निर्णय घ्याल. घरातील समस्या रागाने नव्हे तर प्रेमाने सोडवाल. जोडीदारासह मनमोकळेपणाने केलेल्या चर्चेतून मनावरील तणाव दूर होईल. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा.

कन्या : शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे स्वभावातील चंचलतेला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. जुन्या-नव्याचा संगम साधाल. नोकरी-व्यवसायात लिखित व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात लाभ मिळतील. त्याची चिडचिड वाढेल. अपचनाचा त्रास होईल. त्वचा विकाराकडे दुर्लक्ष करू नका. नियंत्रित आहार आणि व्यायाम  आवश्यक!

तूळ  : चंद्र आणि  शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या नवपंचम योगामुळे  आपल्या आवडीनिवडी जपाल. नव्या योजना शिस्तबद्ध पद्धतीने आखाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून मिळालेल्या मदतीमुळे आर्थिक लाभ होतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्यावरील तणाव वाढेल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या भेटीगाठी होतील. तळपायाची जळजळ होईल.

वृश्चिक : शक्तिवर्धक व ऊर्जादायक रवी आणि उमेद, उत्साह देणारा चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे कामातील अडथळे पार करून पुढे जाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करता करता दमछाक होईल. सहकारी वर्ग कामात हलगर्जीपणा करेल. व्यवहारचातुर्याने कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवेल. प्रेमाच्या गुजगोष्टींमुळे नाते दृढ होईल. कामानिमित्त लहान-मोठा प्रवास कराल. पित्त आणि अपचन होण्याच्या शक्यता आहेत.

धनू  : चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे आपल्यातील गुणांना वाव मिळेल. कला क्षेत्रात प्रगती कराल. नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांची पूर्तता करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब कराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने कामाला गती येऊन नवी आव्हाने स्वीकारण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराचा प्रगतिकारक प्रवास आनंददायी ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. त्वचा आणि उत्सर्जन संस्था यांची काळजी घ्यावी.

मकर : चंद्र-बुध यांच्या समसप्तम योगामुळे चंद्राच्या क्रियाशीलतेला बुधाच्या बुद्धिमत्तेची योग्य जोड मिळेल. व्यवहारचातुर्याचा उत्तम उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. व्यवसायवृद्धीसाठी नव्या योजना आखाल. सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. अपेक्षित वेळेत कामे पूर्ण न झाल्यास चिडचिड करू नका. काही गोष्टी आपल्या हातात नाहीत याची जाण ठेवा. ओटीपोट, मांडय़ा , कंबर यांचे दुखणे सतावेल.

कुंभ : चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे आपल्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त नव्या वाटा चोखळाल. जनसंपर्क वाढेल. नोकरी-व्यवसायात आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल. वरिष्ठांना आपले म्हणणे समजावून द्याल. सहकारी वर्गाला सर्वतोपरी मदत कराल. कुटुंबाचा आधार बनाल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्याची मानसिकता समजून घ्याल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने सद्य:स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल.

मीन : बुध-गुरूच्या लाभयोगामुळे बुधाची बुद्धी आणि गुरूचे ज्ञान यांचा योग्य समन्वय साधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे मोठी कामगिरी पार पाडाल. सहकारी वर्गाच्या समस्यांना वाचा फोडाल. जोडीदाराच्या कामातील अडथळे त्याला अस्वस्थ करतील.  कौटुंबिक कलह मर्यादेत ठेवा. मणका सरकणे, मणक्यात पाणी होणे तसेच डोळ्यांचे विकार त्रास देतील.