१. श्री गणपती स्तोत्र ( प्रणम्य शिरसा देवम्) हे कोणत्या पुराणातून घेण्यात आले आहे?

२. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ही गजाननाची आरती कोणी लिहिली आहे?

३. ‘स्वामी’ या कादंबरीतील थोरले माधवराव पेशवे हे सातत्याने गजाननाचा नामजप करीत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक त्यांचे खास श्रद्धास्थान. तो गणपती कोणता?

४. पुण्याच्या सार्वजनिक गणपती मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिला मान दिला जातो. यामागील ऐतिहासिक कथा किंवा कारण कोणते सांगण्यात येते?

५. कसबा गणपतीला पहिला मान देण्याचा निर्णय किंवा प्रस्ताव कुणाचा होता?

६. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास किती साली प्रारंभ केला आणि तो पहिला सार्वजनिक गणपती कोणता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरे : १. श्री नारद पुराण
२. श्री समर्थ रामदास स्वामी.
३. थेऊरचा चिंतामणी.
४. यवनांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्या पुण्यात राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला तो कसब्यातून. आणि त्यापूर्वी त्यांनी येथे गणपतीची स्थापना केली. त्याची आठवण म्हणून या गणपतीस पहिला मान दिला जातो.
५. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
६. १८९३ साली आणि पहिला गणपती गिरगांव येथील केशवजी नाईकांची चाळ येथील.