04 August 2020

News Flash

प्रियंका गांधी-वढेरा यांचे आरोप अमित शहा यांनी फेटाळले

महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी प्रियंका गांधी-वढेरा यांनी भाजपचे पंतप्रदानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांचे मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांनी जोरदार खंडन केले आहे.

| April 29, 2014 02:17 am

महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी प्रियंका गांधी-वढेरा यांनी भाजपचे पंतप्रदानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांचे मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांनी जोरदार खंडन केले आहे. या बाबत न्यायिक आयोग तपास करीत असून त्यांच्या अहवालाची जनतेने प्रतीक्षा केली पाहिजे, असे शहा यांनी म्हटले आहे. पाळत प्रकरणी न्यायिक आयोगाकडून तपास सुरू असल्याने नव्याने चौकशी समिती स्थापन करण्याची गरज नाही असे स्पष्ट करून शहा यांनी, काँग्रेसची चौकशीची मागणी फेटाळली. प्रियंका गांधी-वढेरा काय म्हणाल्या ते महत्त्वाचे नाही. कारण याची चौकशी सुरू आहे, असे शहा म्हणाले.
मोदी हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाता मारतात, मग महिलांचे खासगी संभाषण ऐकण्याची त्यांना गरजच काय, असा सवाल प्रियंका यांनी  केला होता. महिलांविरुद्ध अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या नेत्यांना पक्षातून हाकलून देणेच योग्य ठरेल, असेही प्रियंका म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2014 2:17 am

Web Title: amit shah rejected allegation made by priyanka gandhi on modi
Next Stories
1 संक्षिप्त : निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल – जयराम रमेश
2 काँग्रेस शंभरीही गाठणार नाही
3 भाजपची अवस्था गोंधळलेल्या उंदरासारखी – प्रियंका
Just Now!
X