06 July 2020

News Flash

‘रोड शो’ दरम्यान केजरीवाल यांना ठोसा मारला!

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तीने पाठीमागून गुद्दा मारल्याची घटना शुक्रवारी घडली.

| April 5, 2014 04:24 am

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना प्रचारादरम्यान अज्ञात व्यक्तीने पाठीमागून गुद्दा मारल्याची घटना शुक्रवारी घडली. दक्षिण दिल्लीतील दक्षिणपुरी भागात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रचार करताना अज्ञात व्यक्तीने गुद्दा मारल्यानंतर केजरीवालांना आणखी मारण्याचा प्रयत्न केला. आपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला त्वरीत पकडून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी रोड शो रद्द केला.
या घटनेनंतर केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधानपद मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.त्यांना  जे काही करायचे आहे ते करू दे.मात्र आम्हाला मिळालेल्या शिकवणीनुसार आम्ही अहिसेंच्या मार्गानेच जाऊ, असेही ते म्हणाले.  केजरीवाल यांनी आपच्या कार्यकर्त्यांना कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही केले.
दिल्लीतील या प्रचारादरम्यान केजरीवाल शुक्रवारी साकेत, मेहरौली आणि लाडो सारी या भागातून रोड शो करणार होते. मात्र त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांनी पुढील प्रचार कार्यक्रम रद्द केल्याचे आपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2014 4:24 am

Web Title: arvind kejriwal punched during roadshow in delhi aap supporters thrash attacker
Next Stories
1 चौकस वृत्तीनं मतदान करा!
2 राहुल पंतप्रधान झाल्यास मोदी सहा महिन्यांत कारागृहात – बेनीप्रसाद
3 दुंदुभी नगारे
Just Now!
X