07 August 2020

News Flash

मोदी उच्चवर्णीयच : काँग्रेसचा आरोप

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे उच्चवर्णीयच असून राजकीय फायदे, लाभ मिळविण्यासाठी त्यांनी ‘इतर मागासवर्गीय वर्गा’शी (ओबीसी) संबंधित असलेल्या दर्जात फेरफार केला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसने गुरुवारी

| May 9, 2014 02:53 am

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे उच्चवर्णीयच असून राजकीय फायदे, लाभ मिळविण्यासाठी त्यांनी ‘इतर मागासवर्गीय वर्गा’शी (ओबीसी) संबंधित असलेल्या दर्जात फेरफार केला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसने गुरुवारी केला. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली असताना तसेच मोदी लढवीत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील निवडणूकही अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेसच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची दाट शक्यता आहे.
मोदी यांचे कडवे टीकाकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंग गोहील यांनी आपल्या या आरोपाची पुष्टी देताना गुजरात सरकारचे एक परिपत्रकच सादर केले. मोदी २००१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपण ‘मोद घंचीस’ या अन्य मागासवर्गीय वर्गाशी संबंधित असल्याचे म्हटले होते. या परिपत्रकात या बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे, याकडे गोहील यांनी लक्ष वेधले. आपण इतर मागासवर्गीय जातींशी संबंधित असल्याच्े सांगुन मोदी हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन्य मागासवर्गीयांची मते आपल्याला मिळविण्यासाठी मोदी हे आपण त्यांच्याशी संबंधित असल्याचे प्रचारात सांगत असले तरी ते ‘ओबीसी’ नाहीत. ते अत्यंत श्रीमंत आणि प्रगत अशा ‘मोद घंचीस’ जातीशी संबंधित आहेत आणि मोदी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी सदर जमात अन्य मागासवर्गीयांमध्ये केव्हाही गणली गेली नव्हती किंवा त्यांना आरक्षणही देण्यात आले नव्हते. या उच्च जातीचा समावेश अन्य मागासवर्गीयांच्या यादीत करून मोदी यांनी ‘ओबीसीं’चे हक्क हिरावण्याचे पाप केले आहे, असा आरोप गोहील यांनी केला.

‘मोदी चहा विक्रेते नव्हतेच’
मोदी हे चहाविक्रेते कधीच नव्हते असे स्पष्ट करत गोहिल यांनी, मोदी काकांच्या चहाच्या कँटीनमध्ये वेळ वाया घालवण्यासाठी जात असत असे सांगितले. विशेष म्हणजे त्या नातेवाईकाचे कंत्राट चरस विक्री करीत होते म्हणून रद्द करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे लहानपणी चहा विकला असे मोदी वारंवार सांगत आहेत. मात्र त्यांचा हा खोटारडेपणा आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने ही हकिकत मला सांगितली, असे गोहिल यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2014 2:53 am

Web Title: narendra modi belongs to upper caste manipulated obc status congress
Next Stories
1 तावडे यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनच काम करीत राहावे.!
2 BLOG : मोदींचा थेट तंबूत घुसून हल्ला!
3 निवडणूक आयोग पक्षपाती – मोदींची घणाघाती टीका
Just Now!
X