गेल्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियोजनशून्य आर्थिक धोरण देशात राबवले. भ्रष्टाचाराची पाठराखण करून देशाला आर्थिक खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. अराजकसदृश कारभारामुळे आर्थिक विकासाचा दर खाली आला. अर्थसंकल्पात मोठी तूट निर्माण झाली असल्याची टीका करत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या धोरणांवरी टीका केली.  नवीन सरकार सत्तेत आल्याशिवाय आर्थिक सुधारणा अशक्य असल्याचे प्रतिपादनही स्वामी यांनी यावेळी केले.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात आर्थिक विकासाचा चढता आलेख होता. औद्योगिक नवीन धोरणे राबवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या होत्या असे ते म्हणाले.