अलिबाग— रायगड जिल्ह्यात २४ तासात तब्बल ५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात ७१२ जणांना करोनाची लागण झाली. सक्रीय रुग्णांची संख्या १३ हजार ०२२ वर पोहोचली. दिवसभरात १ हजार २१३ जणं उपचारानंतर बरे झाले आहेत.  रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७१२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल मनपा हद्दीतील तब्बल २५७, पनवेल ग्रामिण मधील १२४, उरण १९, खालापूर ६६, कर्जत १७, पेण ३४, अलिबाग ९४, मुरुड ९, माणगाव ८, तळा २, रोहा ४२ सुधागड ६, श्रीवर्धन ६, म्हसळा ०, महाड २३, पोलादपूर ५ रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात पनवेल मनपा हद्दीत १९, पनवेल ग्रामिण १, उरण ५, कर्जत ६, पेण ७, अलिबाग ६, मुरुड २, रोहा २, महाड १ पोलादपूर १ अशा एकुण २८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या १३ हजार ०२२ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ३ हजार ८४८, पनवेल ग्रामिण हद्दीतील १ हजार ५९२, उरण मधील ४८०, खालापूर ८७८, कर्जत ५५६, पेण ७५२, अलिबाग ३ हजार १०५, मुरुड ७३, माणगाव ३३२, तळा १९, रोहा ७४२, सुधागड ९८, श्रीवर्धन ९३, म्हसळा ३३, महाड २६५, पोलादपूर १५६ रुगणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १ लाख १० हजार १४५ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील ९४ हजार ७७९ जणांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. तर २ हजार ३३४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सRीय रुग्णांचे प्रमाण १२ टक्कय़ावर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्कय़ावर आहे. तर मृत्यूदर २ टक्कय़ावर स्थीर आहे. जिल्ह्यातील १ हजार ४३६ रुग्णांना प्राणवायू पुरवठा करावा लागत आहे. तर २९७ जणांना अतिदक्षता विभागात, तर १७५ जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. १० हजार हून अधिक रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील लसीकरण स्थिती

जिल्ह्यात १ लाख ५९ हजार ५७६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.१ लाख ४८ हजार ९३१ पुरुष, १ लाख १० हजार ६२२ महिला तर २० इतर जणांचा समावेश आहे. २ लाख १९ हजार १७३ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ४० हजार ४०० जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ९४९ जणांचे सोमवारी लसीकरण करण्यात आले.