“भाजपा आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंडयाचा भाग आहे. घरातली भांडणं बाहेर जाऊ न देणं, दुसऱ्याला मोठं करणं फक्त घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकिट का नाकारण्यात आलं याची कारणमीमांसा केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

‘इतक्या मोठ्या नेत्यानं पक्षाचे वाभाडे करताना विचार तर करायला हवा’ असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. ‘नाथाभाऊंना आतापर्यंत सात-आठवेळा संधी दिलीय. तसेच त्यांच्या मुलाला व सुनेलाही संधी देण्यात आली आहे’ असे पाटील म्हणाले.

आणखी वाचा- मुलगा आणि सुनेसाठी तुम्ही उमेदवारांच्या पाठित खंजीर नाही खुपसला का?; खडसेंविरोधात भाजपा आक्रमक

“पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं असंच माझं व देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानं तिकिट नाकारलं असल्याचं पाटील म्हणाले.