27 September 2020

News Flash

नुसत्या नोकर्‍यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील प्रतिभा ओळखा : राज ठाकरे

'मी लहान असताना दादर येथील एक वडापाव खाण्यास जात असे. त्यावेळी...

प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्याच्या मागे लागू नका. स्वतःमधील प्रतिभा शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथील मनसे नोकरी महोत्सवामध्ये उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.

पुण्याच्या हडपसर येथील बंटर स्कूल येथे पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलत होते. यावेळी माजी गटनेते बाबू वागस्कर, माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘काही दिवसापूर्वी नापासांचे प्रगती पुस्तक वाचले असून यात अनेक व्यक्तींबाबत माहिती मिळण्यास मदत झाली. त्यामध्ये शिक्षणात मागे राहून देखील कोणी पंतप्रधान, उद्योजक झाल्याचे वाचण्यास मिळाले. तेव्हा एक लक्षात आले की पास, नापास होणे याचा आयुष्याशी काहीही संबध नसतो. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे न लागता एका ठिकाणी शांत बसून स्वतः मधील गुण शोधा आणि त्याप्रमाणे काम करा’. बालपणातील आठवणीला उजाळा देत ते पुढे म्हणाले की, ‘मी लहान असताना दादर येथील एक वडापाव खाण्यास जात असे. त्यावेळी साध्या वडापावच्या त्या दुकानावर काही दिवसांनी आयकर विभागाचा छापा पडला. त्यावेळी त्या विक्रेत्याची कमाई किती असेल? पण त्या विक्रेत्याने स्वतः मधील टॅलेंट ओळखल्यामुळे व्यवसायामध्ये यशस्वी झाला. तरुणांनी स्वतःमधील टॅलेंट वाया घालवू नका, स्वतः ला सिद्ध करा’ अशा शब्दात त्यांनी उपस्थित तरुणाईला मार्गदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 1:06 pm

Web Title: fathers day raj thackeray speech important message for youth sas 89
Next Stories
1 ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळो’, पुण्यात वटवृक्षाला महिलांनी नव्हे तर पुरुषांनी मारल्या फेऱ्या
2 विखे, शेलार, क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ
3 मंत्रिमंडळाचा आज विस्तार
Just Now!
X