येत्या पाच दिवसांमध्ये विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) याबाबत इशारा दिला आहे. या उष्णतेच्या लाटेचा अकोला, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना तडाखा बसू शकतो. याशिवाय गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आणि वर्ध्यातही उन्हाच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.

विदर्भात येत्या पाच दिवसांमध्ये सरासरीपेक्षा तापमान काही अंशांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. २२ एप्रिल ते २६ एप्रिल या पाच दिवसांमध्ये उन्हाच्या झळा बसू शकतात. उष्णतेच्या लाटेचा मुंबईवर मात्र फार परिणाम होण्याची शक्यता नाही. या उष्णतेच्या लाटेचा उर्वरित महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता नाही. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमाल तापमानात थोडीफार वाढ होऊ शकते.

शनिवारी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर येथील सरासरी तापमानापेक्षा हे तापमान २ अंशांनी अधिक होते.