राज्यात विरोधकांचे दूध दरवाढीचे तिसरे आंदोलन १३ ते २८ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच लाख पत्र पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  प्रति लिटर १० रुपये आणि ५० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, ही मुख्य मागणी आहे किंवा शेतकऱ्यांचे गायीचे दूध ३० रुपये दराने खरेदी करावे ,अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

माजी कृषी राज्य मंत्री, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी दूध दरवाढ निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे . तर एक ऑगस्ट रोजी दूध बंद आंदोलन करण्यात आले होते.

मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला. सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.