25 February 2021

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या लातूर हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार

२५ मे २०१७ रोजी निलंग्याहून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर कोसळलं होतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाच दिवसांपूर्वी निलंग्यात आगमन झाले. येथील कामांचे उद्घाटन आदी कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासाला निघत असताना काही क्षणातच त्यांचे हेलिकॉप्टर घरांवर जाऊन कोसळले.

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं तपास अहवालाच नमूद करण्यात आले आहे. विमान दुर्घटना पथकाने आज आपला अंतिम अहवालात सादर केला. २५ मे २०१७ रोजी निलंग्याहून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातामधून ते थोडक्यात बचावले आहेत. अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये किती वजन असावे, तापमान किती असाव याचा विचार करण्यात आला नव्हाता. पायलटला निलंबित करण्याची शिपारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. “वैमानिकांनी मोजलेलं वजन ४९४० किलो होतं. परंतु न मोजलेल्या ७२ किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचं एकूण वजन सुमारे ५०७२ किलोंवर पोहोचलं होतं,” असं अहवालात म्हटलं आहे. तसेच यासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असेल तर गंभीर बाब आहे असेही नमूद करण्यात आले आहे.

हेलिपॅडजवळचे विद्युत खांब आणि तारांची काळजी पायलटने घेणे अपेक्षित असते. तसेच लातुरच्या उष्ण हवामानात हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी क्षमतेपेक्षा कमी भार घेणे आवश्यक असतानाही त्याची काळजी पायलटनं घेतली नाही, असंही अहवालात नमूद करण्यात आलंय.

काय झालं होतं?
लातूर दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस निलंग्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. हेलिपॅडची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले. सुदैवाने हेलिकॉप्टर खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळले. उड्डाण केल्यानंतर लाईटच्या तारेला हेलिकॉप्टरचा काही भाग लागल्यामुळे हा अपघात झाला. अपघातापासून १०० मीटर अंतरावर विजेचा ट्रान्सफॉर्मर होता. हेलिकॉप्टर या ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठा अपघात झाला असता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:38 pm

Web Title: pilot error to blame for cm fadnaviss helicopter crash in latur says probe report
Next Stories
1 मराठा आरक्षणावर आम्ही ठाम; विरोधकांनी अडथळा आणू नये – मुख्यमंत्री
2 जाणून घ्या गोवर-रुबेला लसीकरण का महत्त्वाचे
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X