04 August 2020

News Flash

सोलापुरात वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे तापमानाचा पारा वाढत चालला असताना दुसऱ्या बाजूला अक्कलकोट व अन्य भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. या अवकाळी पावसातच वीज कोसळून एका

| April 11, 2015 03:40 am

सोलापूर जिल्ह्य़ात एकीकडे तापमानाचा पारा वाढत चालला असताना दुसऱ्या बाजूला अक्कलकोट व अन्य भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. या अवकाळी पावसातच वीज कोसळून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ही घटना घडली.
शिवानंद महादेव बिराजदार (५०, रा. दर्गनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर शहराजवळ अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी गावच्या शिवारात शिवानंद हा आपल्या शेळ्या-मेंढय़ा राखण्याचे काम करीत होता. त्यावेळी अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला. त्याचवेळी आकाशातून विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळली. कोसळलेली वीज शिवानंदला चाटून गेल्याने तो धक्का बसून बेशुद्ध पडला. त्यास पुतण्या राजू बिराजदार याने तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2015 3:40 am

Web Title: shepherd died due to thunder collapses
टॅग Solapur
Next Stories
1 अवकाळी पावसाने घेतला दोघांचा बळी
2 अर्बन बँकेला ९ कोटींचा नफा
3 पौळ पिप्रीला तरुणाचा खून, आष्टीत युगुलाची आत्महत्या
Just Now!
X