20 October 2020

News Flash

दिलासा! महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या संख्या जास्त

दिवसभरात राज्यात १९ हजार ९३२ जणांना डिस्चार्ज

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढत असला तरी, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. राज्यात आज १९ हजार ९३२ जणांची करोनावर मात केली आहे. तर, ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर पोहचला आहे.

देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एक दिवसात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

तर, आज दिवसभरात राज्यात ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहचली आहे.

राज्यातील एकूण १३ लाख ५१ हजार १५३ करोनाबाधितांमध्ये २ लाख ६५ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ४९ हजार ९४७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३५ हजार ७५१ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 8:27 pm

Web Title: the number of people recovering from corona is higher than the number of corona patients in the state today msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 साखर सहसंचालक कार्यालयात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन; निवेदन फाडून अधिकार्‍यांच्या अंगावर भिरकावले
2 निर्बंध असताना लातूर जिल्ह्यात उघडलं मंदिर; व्यवस्थापनाला पाठवली नोटीस
3 भागवताचार्य वा.ना.उत्पात यांचे करोनामुळे निधन
Just Now!
X