महाराष्ट्रात आज ३२१४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १९२५ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ६९ हजार ६३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर नवे ३२१४ रुग्ण आढळल्याने आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या ही १ लाख ३९ हजार १० इतकी झाली आहे. आजपर्यंत ८ लाख २ हजार ७७५ नमुने हे चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ६२ हजार ८३३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान जे २४८ मृत्यू नोंदवले गेले आहेत त्यातले ७५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १७३ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातला मृत्यू दर ४.६९ टक्के इतका आहे. तर महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.९ टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात ६ लाख ५ हजार १४१ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २६ हजार ५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.