अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाला त्‍यांच्‍या होम ग्राऊंडवर मोठा हादरा बसला आहे. अॅड. आस्‍वाद पाटील यांनी शेकापचे जिल्‍हा चिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्‍या प्राथमिक सदस्‍यत्‍वाचाही त्‍यांनी त्‍याग केला आहे. आस्‍वाद पाटील हे शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. रायगडच्‍या पाटील कुटुंबातील गृहकलह पुन्‍हा एकदा समोर आला आहे. अॅड. आस्‍वाद पाटील हे लवकरच भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याची खात्रीलयक माहिती आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणूकीत जयंत पाटील यांच्‍या सुनबाई चित्रलेखा पाटील या शेकापच्‍या उमेदवार असतानाही त्‍यांचे भाचे आस्‍वाद पाटील, बंधू माजी आमदार पंडित पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीपूर्वीच त्‍यांनी चित्रलेखा पाटील यांच्‍या उमेदवारीला विरोध केला होता. या निवडणूकीत चित्रलेखा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
Ajit Pawar , Bhandara District Guardian Minister,
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे? प्रफुल्ल पटेलांच्या खेळीने…
youth pistols Marathwada marathi news
सत्ता, श्रीमंती मिरवण्यासाठी कंबरेला पिस्तूल, बीडसह संपूर्ण मराठवाड्यात लाखोंची ‘हौस’
Ramdas Athawale statement on Santosh Deshmukhs murder case
बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले

हेही वाचा…सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी संपल्‍यानंतर आता शेकापमधील कुटुंब कलह समोर आला आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव अॅड. आस्‍वाद पाटील यांनी जिल्‍हा चिटणीस पदासह पक्ष सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. आज हॉटेल रविकिरण येथे आस्‍वाद पाटील यांच्‍या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत आस्‍वाद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले. या बैठकीला पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपसथित होते. आस्‍वाद पाटील यांनी पक्षाच्‍या जिल्‍हा चिटणीस पदासह रायगड जिल्‍हा परीषदेचे उपाध्‍यक्षपद भूषवले आहे. त्‍यांनी पक्षाला दिलेली सोडचिठठी हा शेकापला मोठा हादरा मानला जात आहे.

हेही वाचा…शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा

लवकरच भाजप प्रवेश ?

कोकण पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणूकीपासून आस्‍वाद पाटील हे भाजप नेत्‍यांच्‍या संपर्कात होते. विधानसभा निवडणूकीत ते अलिप्‍त राहिले. त्‍याचा मोठा फटका चित्रलेखा पाटील यांना बसला. आपण कुठल्‍या पक्षात जाणार यावर आस्‍वाद पाटील बोलायला तयार नाहीत. मात्र भाजप नेत्‍यांशी झालेल्‍या अंतिम बोलणीनुसार ते लवकरच भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे त्‍यांच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले.

Story img Loader