Amol Mitkari on Suresh Dhas: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी (दि. ४ जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर जाहीर सभा पार पडली. या सभेत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत त्यांनी धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री न देण्याची मागणी केली. या मागणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पलटवार करण्यात आला आहे. विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बेभान सुटलेल्या बैलाला किती मोकाट सोडणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सुरेश धस काय म्हणाले होते?

धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये, असे सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवावे, अशीही मागणी त्यांनी केली. यावर परभणी जिल्ह्यात भाष्य करताना ते म्हणाले, “मी अजितदादांना बोललो होतो, आमच्या पक्षाकडून संधी मिळत नाही तर प्रकाश सोळंकेला पालकमंत्री करा. नाहीतर राजेश विटेकरला करा. दोघांनाही करता येत नसेल बुलढाण्यातील आमदार मनोज कायंदे यांना मंत्रिपद द्या. ते तर घड्याळाकडून निवडून आले आहेत. हे होत नसेल तर आमचा जिल्हा बिनमंत्र्याचा राहू द्या. नाहीतर लोक म्हणतील अजितदादा क्या हुआ तेरा वादा.”

हे वाचा >> Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल मिटकरींची टीका

सुरेश धास यांच्या खोचक टिप्पणीनंतर आता अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. “श्री. देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”