भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी या ठिकाणी भाषण करताना एक मोठं वक्तव्य केलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. खासदर करुन तुम्हीच दूर लोटलं असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सुजय विखे पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळणार नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशात आता त्यांनी शिर्डीतल्या सभेत हे वक्तव्य केलं आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी जवळ असलेल्या राहाता शहरात महिला बचत गटाला साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं आहे. “आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपांना मी दोन महिन्यांनी उत्तरं देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईन. काळजी करू नका”, असं वक्तव्य केल्याने सुजय विखेंना नेमकं म्हणायचं काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Ajit pawar faction threatens to walk out of Mahayuti
“.. तर महायुतीमधून बाहेर पडू”, अजित पवार गटाचा आता निर्वाणीचा इशारा
Sharad Pawar
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

कार्यकर्त्यांना सुनावले खडे बोल

सुजय विखे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलं. “जनतेची कामं जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही आमच्या विरोधाकांना अपमानीत करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण कराल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची ही शिकवण नाही”, अशा शब्दांत सुजय विखेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे.