चीनच्या सैनिकांचे हल्ले होतच असून, भारताचा भूभागही त्यांनी बळकावला आहे. मात्र, संसदेत त्यावर नरेंद्र मोदी सरकार चर्चाच करीत नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केली.

हेही वाचा- मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? संजय शिरसाट यांनी सांगितली तारीख; म्हणाले “येत्या २० ते…”

चव्हाण म्हणाले, की केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधन करातून तब्बल २८ लाख कोटी रुपये गोळा केले. अन्य करवाढीचा बोजाही वाढतच असताना देशाची आर्थिकदृष्ट्या मात्र, प्रचंड अधोगती सुरु आहे. मोदी सरकारने इतिहासातील सर्वाधिक कर्ज करून ठेवले आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडे व्यवस्था चालवायला, पगाराला आणि कर्जाचे हप्ते द्यायलाही पैसे नसल्याने सरकारी कंपन्या, बंदरे विकून खर्च भागवला जात आहे. मंगळसूत्र विकून देश चालवण्याची नामुष्की पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आली आहे. रस्ते, प्रकल्पांवर प्रचंड खर्च होत असताना, या सरकारचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचीही टीका चव्हाण यांनी केली.

हेही वाचा- “अरे तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का?” भर पत्रकार परिषदेत संजय राऊत पत्रकारावर भडकले

भारताची जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे नरेंद्र मोदी सांगत असलेतरी भारतीयांचे दरडोई उत्पन्न तळाशी आहे. गरिबी, बेकारी, कुपोषण झपाट्याने वाढत असताना गौतम अदानीसारखा एक उद्योगपती भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत मात्र, कसा होतो असा प्रश्न पृथ्वीराजांनी केला. सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अत्याचाराचा प्रश्न राज्य सरकारने सोडवणे गरजेचे असताना राज्य सरकार कर्नाटकच्या दबावाखाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एक इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा देत असताना महाराष्ट्र सरकार सडेतोड प्रत्युत्तर देत नाही. खरेतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वमान्य असताना त्यांचे असले बोलणे योग्य नाही. सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांच्या नेतृत्वांमध्ये चर्चा झाली. पण, त्याची नेमकी माहिती बाहेर आली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केवळ चहा बिस्कीट घेऊन तेथून परत आले असावेत अशी खिल्ली चव्हाण यांनी उडवली.

हेही वाचा- औरंगजेबावरील विधानावरून नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका, ‘उंची किती, वजन किती’चा उल्लेख करत म्हणाले; “आमचा खरा आक्षेप…”

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ना भूतो ना भविष्यती असा प्रतिसाद मिळत असून, राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक चळवळीतील बहुतेक संघटनांनी सहभाग घेतल्याचे सांगताना यानंतर प्रत्येक राज्यात ‘हात से हात जोडो’ यात्रा काढण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महापुरुषांचे अवमान, गायरान गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सरकारने चर्चा केली नाही. सरकारमधील अनेकांचे घोटाळे असून, आम्ही आणखी पुरावे शोधतोय असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा- “…तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे”, संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांना भावनिक पत्र, म्हणाले, “बाबा मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याने येणाऱ्या निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्रपक्षाचा धुवा उडणार आहे. आणि म्हणूनच राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत असल्याचीही टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.