प्रियांका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याला आता माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वेळ पडली तर संजय शिरसाट यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “काहीतरी बोलत राहायचं, हे संजय शिरसाट यांचं काम आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे असल्याने संजय शिरसाटांना निवडून देण्याची विनंती जनतेला केली होती. पण, लोक म्हणायचे संजय शिरसाट भेटत नाहीत. ते मुंबईत पाच-पाच दिवस असायचे. संजय शिरसाट मुंबईत कुठे, कोणत्या क्लब आणि डान्सबारमध्ये जातात, हे सर्व जगाला माहिती आहे.”

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : VIDEO: “संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, राज्य महिला आयोगाची फडणवीसांकडे मागणी

“संजय शिरसाटांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आहोत. कधीही ‘मातोश्री’शी गद्दारी करणार नाही. लावा-लाव्या करत मला उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला करण्याचा डाव या मूर्ख माणसाचा आहे. त्यामुळे या माणसाचा मला राग येतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : संजय शिरसाटांच्या ‘त्या’ दाव्यावर केदार दिघे संतापले; म्हणाले, “मंत्रीपदाची भीक…”

“संजय शिरसाट यांच्याविरोधात अनेक मुली उभ्या राहतील. मात्र, माझं नाव घेऊन बोलणे, हे बरोबर नाही. वेळ पडली तर शिवसेना स्टाईलने शिरसाट यांना सरळ करू,” असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
“उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम संजय शिरसाट करत आहेत. प्रत्येक कारस्थान करण्यामागे शिरसाट यांना खोके आणि पेट्या मिळत असतात. माझे डोक फिरलं, तर मी काय करेल पाहा,” असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी शिरसाटांना दिला आहे.